रविवारी (१३ मार्च) आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ चा (ICC Women ODI World Cup 2022) अकरावा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (AUSW vs NZW) संघात झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांमध्ये ८ विकेट्सच्या नुकसानावर २६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ ३१ षटकांमध्येच १२८ धावांवर सर्वबाद झाला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने १४१ धावांनी हा सामना जिंकला. हा ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकातील सलग तिसरा विजय (Australia’s Win Hattrick) होता. तर न्यूझीलंडचा हा दुसरा पराभव होता.
असा झाला सामना
या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या २७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून एकाही खेळाडूला साधे अर्धशतकही करता आले नाही. मधल्या फळीतील एमी शेटरव्हाईट हिने सर्वाधिक ४४ धावा केल्या. ६७ चेंडूंचा सामना करताना ५ चौकारांच्या मदतीने तिने ही खेळी केली. तिच्याव्यतिरिक्त केवळ खालच्या फळीत ली तहुहु हिने २३ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडच्या इतर फलंदाज मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांपुढे जास्त वेळ टिकू शकल्या नाहीत. त्यांच्या तब्बल ७ फलंदाज एकेरी धावेवर बाद झाल्या.
ऑस्ट्रेलियाकडून या डावात डार्सी ब्राउन हिने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तिने ७ षटकांमध्ये २२ धावा देत या विकेट्स घेतल्या. तसेच अमांडा वेलिंग्टन आणि ऍश्ले गार्डनर यांनीही प्रत्येकी न्यूझीलंडच्या २ फलंदाजांना बाद केले.
Australia pull off a comprehensive 141-run win over New Zealand thanks to some big hitting with the bat and a remarkable bowling display 👌#CWC22 pic.twitter.com/UnH95YQLoq
— ICC (@ICC) March 13, 2022
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाकडून प्रथम फलंदाजी करताना एलिसा पेरीने सर्वाधिक ६८ धावा केल्या. ८६ चेंडूंमध्ये १ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने तिने ही खेळी केली. तिच्याबरोबरच तहिला मॅकग्राथ हिनेही अर्धशतक (५७ धावा) झळकावले. तसेच ऍश्ले गार्डनरने ४८ धावा, सलामीवीर रचिल हायनेसने ३० धावा आणि बेथ मूनीने ३० धावा जोडल्या. परिणामी ऑस्ट्रेलियाचा संघ न्यूझीलंडला २७० धावांचे मोठे आव्हान देऊ शकला.
या डावात न्यूझीलंडकडून ली तहुहु हिने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या होत्या. तिने ९ षटके गोलंदाजी करताना ५३ धावा देत या विकेट्स काढल्या होत्या.
Three wins in three matches for Australia 🔥#CWC22 pic.twitter.com/iCDZAGZnNz
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 13, 2022
ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत अव्वलस्थानी
ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध विजयाची हॅट्रिक करत गुणतालिकेत अव्वलस्थानी (Australia On Top In Point Table) ताबा मिळवला आहे. त्यांच्या नेट रन रेटमध्येही मोठी सुधारणा झाली आहे. सध्या त्यांचा नेट रन रेट +१.६२६ इतका आहे. तर हा सामना गमावणारा न्यूझीलंडचा संघ चौथ्या स्थानावर आला आहे. त्यांच्यापुढे न्यूझीलंड आणि भारताचा संघ गुणतालिकेत टॉप-३ मध्ये आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अरर! श्रेयस झाला स्टंप आऊट, तेही नव्वदीत; ‘या’ नकोशा यादीत सचिन, सेहवागच्या पंक्तीत सामील
भारताने पराभवाची धूळ चारलेल्या वेस्ट इंडिजला आणखी एक धक्का, आयसीसीने ठोठावला मोठा दंड
पाकिस्तानी दर्शकांकडून ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे जोरदार स्वागत, पण तो आला तसाच गेला; पाहा काय झालं?