भारत आणि पाकिस्तान (INDWvsPAKW) यांच्यात रविवारी (६ मार्च) पहिला विश्वचषकाचा सामना खेळला गेला. भारत-पाकिस्तान संघात रोमांचक सामना पाहायला मिळाला. मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला. भारतीय संघाने हा सामना १०७ धावांनी जिंकला. भारतीय संघाच्या सामन्याची सुरुवात खराब झाली होती, परंतु नंतर पूजा आणि स्नेह राणा यांच्या कामगिरीमुळे भारतीय संघाने विजय मिळवला. भारतीय संघाची सलामीवीर स्म्रीती मंधानाच्या (Smriti Mandhana) फलंदाजीचे सर्वजण चाहते आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आपल्या अर्धशतकीय खेळीत मंधानाने षटकार लगावला पाकिस्तानच्या महिला खेळाडूही तो षटकार पाहून थक्क झाले.
भारताच्या फलंदाजी दरम्यान १० व्या षटकात हा षटकार पाहायला मिळाला. याअगोदर मंधानाने असाच फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो सीमारेषेवर जाऊन पडला. मंधानाने यानंतर पुन्हा इन-साइड-आऊट फटका मारला. त्यावेळी चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाऊन पडला. या शाॅटचा व्हिडिओ महिला विश्वचषकाच्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत पाकिस्तानी क्षेत्ररक्षक तो षटकार पाहतच राहिली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर क्रिकेट चाहत्यांनी कमेंट देखील केल्या आहेत.
या सामन्यात भारतीय कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने पाकिस्तान संघासमोर विजयासाठी २४५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताकडून खेळताना शेफाली वर्मा शून्य धावेवरच तंबूत परतली. मंधानाने अर्धशतकी खेळी केली. पाकिस्तान संघ लक्ष्याचा पाठलाग करताना १३७ धावांवरच सर्वबाद झाला. या सामन्यात सामनावीर म्हणून पूजा वस्त्नाकरला गौरवण्यात आले.
https://www.instagram.com/reel/CavqSDClE__/?utm_source=ig_embed&ig_rid=ba829435-1163-466e-ab0b-02808a945df6
पाकिस्तान महिला संघ (प्लेइंग इलेव्हन):
जावेरिया खान, सिदरा अमीन, बिस्माह मारूफ (कर्णधार), ओमैमा सोहेल, निदा डार, आलिया रियाज, फातिमा सना, सिदरा नवाज (यष्टीरक्षक), डायना बेग, नशरा संधू, अनम अमीन
भारत महिला संघ (प्लेइंग इलेव्हन):
स्म्रीती मंधाना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, हरमनप्रीत कौर, मिताली राज (कर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, झूलन गोस्वामी, मेघना सिंग, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड
महत्त्वाच्या बातम्या
राजेश्वरीचे ‘राज’! महिला विश्वचषकात अशी कामगिरी करणारी बनली एकमेव गोलंदाज
‘शेन वॉर्नने मला मोठा मंच उपलब्ध करून दिला’, नाबाद १७५ धावा ठोकल्यानंतर ‘रॉकस्टार’ जडेजा भावुक
क्या बात! पुन्हा एकदा भारतापुढे पाकिस्तानला टेकावे लागले गुडघे, १०० टक्के विजयाचा रेकॉर्ड अबाधित