न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ स्पर्धा अंतिम चरणात पोहोचली आहे. लवकरच विश्वचषकातील उपांत्य फेरी सामने होणार आहे. यातील पहिला उपांत्य फेरी सामना बुधवारी (३० मार्च) ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात होणार आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांची स्टार अष्टपैलू एलिसा पेरी (Ellyse Perry) दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर झाली आहे.
गेल्या आठवडत्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या साखळी फेरी सामन्यादरम्यान एलिसाला दुखापत (Ellyse Perry Injured) झाली होती. त्यामुळे केवळ ३ षटके गोलंदाजी केल्यानंतर ती मैदानातून बाहेर गेली होती आणि त्यानंतर तिने फलंदाजीची केली नव्हती.
मात्र ऑस्ट्रेलियाचे संघ व्यवस्थापन तिच्या दुखापतीविषयी निश्चिंत होते. सोमवारपर्यंत (२८ मार्च) ही ३१ वर्षीय खेळाडू दुखापतीतून बरी होईल आणि वेस्ट इंडिजविरुद्ध (AUSW vs WIW) उपांत्य फेरी सामन्यासाठी मैदानात उतरेल, असे त्यांना वाटत होते. परंतु अद्याप तिच्या दुखापतीत कसलीही सुधारणा झालेली नाही.
एलिसाच्या दुखापतीविषयी माहिती देताना मंगळवारी (२९ मार्च) ऑस्ट्रेलिया संघाची कर्णधार मेग लॅनिंग हिने सांगितले की, “दुर्भाग्याने एलिसा अजूनही अनफिट असल्याकारणाने उपांत्य फेरी सामन्यात (World Cup Semi Final) खेळू शकणार नाही. हा संघासाठी मोठा झटका आहे. पण आम्हाला वाटते की, आम्ही त्यातून बाहेर येत येणारा महत्त्वपूर्ण सामना जिंकण्यात सक्षम आहोत. कारणम आमच्याकडे बरेच शानदार खेळाडू आहेत आणि आम्ही नक्कीच वेस्ट इंडिजविरुद्ध दमदार प्रदर्शन करू.”
“आम्ही आताच खूप पुढे जाण्याचा विचार केलेला नाही. पण जर आम्ही या स्पर्धेत अजून पुढे गेलो, तर आम्ही एलिसाच्या दुखापतीनुसार तिला संधी देण्याचा विचार करू. परंतु सध्या आमचा संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यावर जास्त लक्ष केंद्रित करत आहे. मला विश्वास आहे की, आम्ही या सामन्यात आमचे सर्वश्रेष्ट प्रदर्शन करू,” असे पुढे बोलताना मेग लॅनिंग म्हणाली.
एलिसाच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया संघ युवा अष्टपैलू एनाबेल सदरलँडला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा देऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
डिविलियर्सचा ‘तो’ व्हॉईस मॅसेज ऐकून कोहली झाला होता भावूक, सांगितला इमोशनल किस्सा
पाकला पहिल्याच वनडेत ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ पठ्ठ्याने अक्षरशः रडवलं; धुवांधार फटकेबाजी करत ठोकलंय शतक
‘एका शब्दानेही RCBने मला विचारलं नाही, असं कुठं असतं का?’ अखेर ‘त्याची’ दुखरी बाजू जगासमोर