बर्मिंगहॅममध्ये आज भारत आणि इंग्लंड यांच्यात जबरदस्त सामना रंगणार आहे. या सामन्यात दोन्ही देशांचे अनेक माजी क्रिकेटपटू ॲक्शनमध्ये दिसतील. भारतीय संघाचं नेतृत्व युवराज सिंग करणार असून इंग्लंड संघाची कमान केविन पीटरसनकडे आहे. यावेळी रॉबिन उथप्पा, इरफान पठाण, आरपी सिंग, हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांसारखे दिग्गज खेळाडू भारताकडून खेळताना दिसणार आहेत. तर इंग्लंडकडून इयान बेल, केविन ओब्रायन, रवी बोपारा, साजिद महमूद आणि समित पटेल हे खेळाडू खेळतील.
आजपासून इंग्लंडमध्ये ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स’ला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी होत आहेत. भारत, इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. आता आम्ही तुम्हाला या सामन्याचं थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसं पाहता येईल, हे सांगतो.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स’चा पहिला सामना 3 जुलै रोजी बर्मिंगहॅम येथे खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. तुम्ही या सामन्याचं थेट प्रक्षेपण टीव्हीवर ‘स्टार स्पोर्ट्स नेटवर्क’वर पाहू शकता. तर मोबाईलवर तुम्ही ‘फॅनकोड’ किंवा ‘हॉटस्टार’वर सामन्याचा आनंद घेऊ शकता.
भारतीय संघ
रॉबिन उथप्पा, युसूफ पठाण, अंबाती रायडू, सुरेश रैना, युवराज सिंग (कर्णधार), नमन ओझा (यष्टीरक्षक), सौरभ तिवारी, हरभजन सिंग, इरफान पठाण, आरपी सिंग, विनय कुमार, धवल कुलकर्णी, अनुरीत सिंग, राहुल शर्मा, राहुल शुक्ला, पवन नेगी आणि गुरकिरत सिंग मान.
इंग्लंडचा संघ
इयान बेल, केविन ओब्रायन, केविन पीटरसन (कर्णधार), ओवेस शाह, रवी बोपारा, फिल मस्टर्ड (यष्टीरक्षक), समित पटेल, साजिद महमूद, डॅरेन मॅडी, ख्रिस स्कोफिल्ड, रायन साइडबॉटम, उस्मान अफझल, अजमल शहजाद आणि स्टुअर्ट मीकर
महत्त्वाच्या बातम्या –
कमबॅक असावा तर असा! हार्दिक पांड्याचं टीकाकारांना सडेतोड उत्तर, टी20 क्रमवारीत अव्वल स्थानी झेप
तरुण वयात पडले मराठमोळ्या मुलीच्या प्रेमात! खूपच रंजक आहे राहुल द्रविड यांची लव्ह स्टोरी
पाकिस्तान क्रिकेटची उडाली खिल्ली, गाद्या पसरवून झेल घेण्याचा सराव, चाहत्यांनी केले ट्रोल