सर्वाधिक पाच वनडे विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियासाठी 2023 विश्वचषकाची सुरुवात खूपच निराशाजनक ठरली. गुरुवारी (12 ऑक्टोबर) विश्वचषकातील सलग दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. लखनऊमध्ये झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने 134 धावांनी विजय मिळवला. अवघ्या 177 धावांवर ऑस्ट्रेलियान फलंदाजांची भक्कम फळी मोडीत निघाली.
दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉक याला सामनावीर म्हणून निवडले गेले. डी कॉकने अवघ्या 90 चेंडूत शतक पूर्ण केले आणि एकूण 109 धावांचे योगदान दक्षिण आफ्रिकेसाठी दिले. संघाला चांगली सुरुवात मिळाल्यामुळे आफ्रिकी संघ प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 311 धावा करू शकला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन फलंदाज लक्ष्य गाठतील, यावर अनेकांचा विश्वास होता. मात्र, आफ्रिकी संघाच्या बाजूनेच लागला. कागिसो रबाडा याने सर्वाधिक तीन, तर केशव महाराज, तबरेझ शम्सी आणि मार्को यान्सेन यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. परिणामी ऑस्ट्रेलियन संघ 40.5 षटकात अवघ्या 177 धावा करून सर्वबाद झाला.
दक्षिण आफ्रिकेसाठी या सामन्यात डी कॉकव्यतिरिक्त ऍडेन मार्करम यानेही महत्वपूर्ण 56 धावांची खेळी केली. पण संघातील इतर एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. ऑसट्रेलियासाठी मिचेल स्टार आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. जोश हेजलवूड, कर्णधार पॅट कमिन्स आणि ऍडम झॅम्पा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. कमिन्सने सर्वाधिक 71 धावा खर्च केल्या.
312 धावांचे लक्ष्य गाठम्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या पाच विकेट्स अवघ्या 65 धावांवर गमावल्या होत्या. त्यानंतर पुढच्या पाच विकेट्स गमावताना संघाने 112 धावा केल्या. मार्नस लॅबुशेन याने सर्वाधिक 46 धावांचे योगदान दिले. (World Cup 2023 । Australia bowled out for 177 Vs South Africa.)
विश्वचषकातील दहाव्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, जोश इग्लिस (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ऍडम झाम्पा, जोश हेझलवूड
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी
महत्वाच्या बातम्या –
पाच वेळचा जगज्जेता ऑस्ट्रेलियन संघ दक्षिण आफ्रिकेपुढे उध्वस्त! स्वस्तात विकेट्स गमावताच घडला नकोसा विक्रम
खुशखबर! शुभमन गिल पाकिस्तानविरुद्ध खेळणार? सरावालाही केली सुरुवात