• About Us
  • Privacy Policy
शनिवार, डिसेंबर 2, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

IND vs NZ सामन्यापूर्वी दिग्गजाच्या प्रतिक्रियेनं वेधलं लक्ष; हार्दिक पंड्याचे महत्त्व सांगत म्हणाला…

IND vs NZ सामन्यापूर्वी दिग्गजाच्या प्रतिक्रियेनं वेधलं लक्ष; हार्दिक पंड्याचे महत्त्व सांगत म्हणाला...

Atul Waghmare by Atul Waghmare
ऑक्टोबर 22, 2023
in ODI World Cup 2023, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Hardik-Pandya

Photo Courtesy: Twitter/RashmiS61814169

विश्वचषक 2023 स्पर्धेतील सलग चार सामने जिंकून पॉईंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी असणाऱ्या न्यूझीलंडविरुद्ध रविवारी (दि. 22 ऑक्टोबर) भारताचा सामना होणार आहे. हा सामना निसर्गाच्या सानिध्यातील धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या माजी खेळाडूने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की, भारतीय संघाला प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल करावे लागू शकतात. त्याच्यानुसार, हार्दिक पंड्या याच्या दुखापतीमुळे संघात इतके जास्त बदल करावे लागतील.

खरं तर, भारताचा हुकमी एक्का हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला बांगलादेशविरुद्ध पहिलेच षटक टाकताना दुखापत झाली होती. यावेळी चौकार अडवण्याच्या प्रयत्नात त्याच्या डाव्या पायाच्या घोट्याला दुखापत झालेली. पंड्याला स्कॅननंतर विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. तो भारतीय संघासोबत धरमशाला येथे गेला नाहीये. तो आता थेट लखनऊमध्ये संघाशी जोडला जाईल. इथे संघाला इंग्लंडविरुद्ध खेळायचे आहे.

काय म्हणाला माजी भारतीय?
हार्दिक पंड्या बाहेर पडल्यानंतर आता भारतीय संघात बदल होणे निश्चित आहे. मात्र, हार्दिक हा अष्टपैलू होता, त्यामुळे त्याच्या जागी संघाला संतुलन राखण्यासाठी दोन खेळाडूंची निवड करावी लागेल. माजी भारतीय खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्रा (Aakash Chopra) याच्या मते, पंड्यामुळे संघाला अनेक बदल करावे लागतील. त्याने त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना याविषयी विधान केलं.

तो म्हणाला, “मला वाटते की, हार्दिक पंड्या याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव संघाचा भाग बनणार आहे आणि तो सहाव्या क्रमांकावर खेळेल. शार्दुल ठाकूर याच्या जागी मोहम्मद शमी येऊ शकतो. दुर्दैवाने एक खेळाडू बाहेर झाला, पण त्याच्या जागी कमीत कमी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करावे लागतील. यावरून पंड्याचे महत्त्व समजते.”

पंड्याचे विश्वचषकातील प्रदर्शन
विश्वचषकातील हार्दिक पंड्या याच्या प्रदर्शनाविषयी बोलायचं झालं, तर त्याने चमकदार कामगिरी केली आहे. गोलंदाजीत त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक विकेट, तर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानविरुद्ध प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, त्याला एकदाच फलंदाजीची संधी मिळाली होती, ज्यात त्याने नाबाद 11 धावांची खेळी केली होती. अशात पंड्याच्या जागी कोणते दोन खेळाडू येतात, हे पाहावे लागेल. (world cup 2023 former cricketer reacts on indian team changes in absence of hardik pandya)

हेही वाचा-
आता माझी सटकली! न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भडकला द्रविड; म्हणाला, ‘सिक्स-फोर पाहायचे असतील, तर…’
भारतीय संघात होणार मोठे बदल, खुद्द द्रविडने दिले संकेत; म्हणाला, ‘हार्दिकच्या दुखापतीने बिघडले…’

Previous Post

आता माझी सटकली! न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भडकला द्रविड; म्हणाला, ‘सिक्स-फोर पाहायचे असतील, तर…’

Next Post

कहर! WBBLमध्ये ‘या’ खेळाडूने फक्त 23 चेंडूत चोपल्या 114 धावा, चौकार-षटकारांच्या पावसात बॅटही तुटली

Next Post
Grace-Harris

कहर! WBBLमध्ये 'या' खेळाडूने फक्त 23 चेंडूत चोपल्या 114 धावा, चौकार-षटकारांच्या पावसात बॅटही तुटली

टाॅप बातम्या

  • ना सचिन ना विराट! पाकिस्तानी गोलंदाजाच्या मते ‘हा’ आहे भारताचा सर्वात महान फलंदाज
  • दक्षिण आफ्रिकेच्या माजी दिग्गजाची शुबमन गिलबद्दल लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘त्याला अजून खूप…’
  • आफ्रिका दौऱ्यात भुवनेश्वर कुमारला संघात स्थान न मिळाल्याने भारतीय दिग्गज नाराज; म्हणाला, ‘क्वचितच असा…’
  • द्रविडचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ वाढवल्यानंतर गांगुलीची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मी बीसीसीआयचा अध्यक्ष असताना…’
  • IND vs AUS T20: मालिकेतील पाचवा सामना कधी आणि कुठे पार पडणार? वाचा सर्वकाही
  • द्रविडची नाळ मातीशी जोडलेली! पत्नीसोबत पायऱ्यांवर बसून पाहिला लेकाचा क्रिकेट सामना, फोटो जोरात व्हायरल
  • IND vs AUS: बॅाल लागूनही पंचांनीच मागितली माफी, भारतीय क्रिकेटर जीतेश शर्माने मारला होता शॅाट
  • बॅटिंग अशी करा की, दिग्गजही खुश होईल! जितेश शर्माचा झंझावात पाहून माजी क्रिकेटर म्हणाला, ‘खूपच जबरदस्त…’
  • उपकर्णधार असलेला रहाणे आता टीमच्या बाहेर कसा? दिग्गज क्रिकेटपटूचा बोर्डाला सवाल
  • ‘…तर मी कसोटी खेळू शकणार नाही’, Team Indiaच्या स्टार खेळाडूचे धक्कादायक विधान
  • ‘आता जेलमध्ये राहिलेल्या, मॅच फिक्स केलेल्या माणसाला सिलेक्शन कमिटीत घेणार’, माजी क्रिकेटरचे खडेबोल
  • IPL 2024 लिलावात कोणत्या भारतीय क्रिकेटपटूंची बेस प्राईज 2 कोटी रुपये? केदारपासून ‘ही’ आहेत नावं
  • अय्यर संघात असतानाही ऋतुराज गायकवाडला केले उपकर्णधार, BCCI ट्रोल
  • भारतात खेळलेल्या सगळ्या क्रिकेटपटूंचा टी20 रेकॉर्ड मराठमोळ्या ऋतूराज गायकवाडने मोडला, पाहा विक्रम
  • टीम इंडियाने मोडला पाकिस्तानचा अतिशय महत्त्वाचा Record, आता…
  • ऑस्ट्रेलियाला धूळ चारताच कॅप्टन सूर्याची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मला त्याला दबावात टाकायला आवडते…’
  • प्रो कबड्डी लीगच्या १०व्या पर्वाला भव्य क्रूझवर प्रारंभ
  • चौथ्या टी-20 ऑस्ट्रेलियाला नाही गाठता आले 175 धावांचे आव्हान! भारताने साकारला सूर्यकुमारच्या नेतृत्वात पहिला मालिका विजय
  • आता भारताच्या गोलंदाजांची परीक्षा! रिंकू टिकल्यामुळे संघाची 174 धावांपर्यंत मजल
  • IND vs AUS । सलामीवीर ऋतुराजने घडवला इतिहास, एकाही भारतीयाला न जमलेली कामगिरी करून दाखवली
  • About Us
  • Privacy Policy

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In