वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी खेळल्या जात असलेल्या सराव सामन्यांमध्ये भारतीय संघाचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता दुसऱ्या सराव सामन्यासाठी रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ तिरुवनंतपुरम येथे दाखल झाला आहे. यावेळी विमानतळावर खेळाडूंच्या स्वागतासाठी चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. तसेच, भारतीय संघ जेव्हा आपल्या हॉटेलमध्ये पोहोचला, तेव्हा तिथेही खेळाडूंचे जंगी स्वागत झाले. यादरम्यानचा व्हिडिओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
भारतीय संघाचा पहिला सामना 30 सप्टेंबर रोजी इंग्लंडविरुद्ध गुवाहाटी येथे होणार होता. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द झाला. आता रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कंपनी दुसऱ्या आणि अखेरच्या सराव सामन्यात नेदरलँडविरुद्ध भिडणार आहे. दोन्ही संघ 3 ऑक्टोबर रोजी तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडिअममध्ये आमने-सामने असतील. यासाठी रविवारी (दि. 1 ऑक्टोबर) भारतीय संघ तिथे पोहोचला.
स्टार स्पोर्ट्सने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत दिसते की, विमानतळाबाहेर खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. यानंतर भारतीय संघाचे जेव्हा हॉटेलमध्ये आगमन झाले, तेव्हा तिथे खेळाडूंचे पारंपरिक पद्धतीने वाटेत फुले टाकून आणि कपाळावर टिळा लावून स्वागत करण्यात आले.
https://twitter.com/StarSportsIndia/status/1708494222947750398?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1708494222947750398%7Ctwgr%5E2e1425a4235af06e24395e39514af511b4f1281c%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportskeeda.com%2Fcricket%2Fwatch-team-india-players-receive-traditional-welcome-in-thiruvananthapuram-ahead-of-their-2nd-world-cup-2023-warm-up-match
विशेष म्हणजे, भारतीय संघाला आपला पहिला सराव सामना खेळायला मिळाला नसला, तरीही भारतीय संघ आगामी वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेसाठी पूर्णपणे तयार असल्याचे दिसत आहे. मागील महिन्यात रोहितसेनेने आशिया चषक 2023 स्पर्धेचा किताब आपल्या नावावर केला होता. त्यानंतर मायदेशातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतही 2-1ने विजय मिळवला होता.
भारतीय खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांसारखे फलंदाज शानदार फॉर्ममध्ये आहेत. तसेच, गोलंदाजी विभागात मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हेदेखील विरोधी संघांच्या फलंदाजांना घाम फोडण्यासाठी सज्ज आहेत. या स्पर्धेपूर्वी अनेक दिग्गजांनी भारत अंतिम सामन्यात पोहोचेल, अशी भविष्यवाणी केली आहे. भारतीय चाहत्यांनाही आशा आहे की, रोहितसेना आयसीसी ट्रॉफी जिंकू न शकल्याचा दुष्काळ संपवेल. आता 5 ऑक्टोबरपासून स्पर्धा सुरू झाल्यानंतर भारतीय संघ कसे प्रदर्शन करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (world cup 2023 indian team players receive traditional welcome in thiruvananthapuram ahead of their 2nd warm up match)
हेही वाचा-
‘आम्ही सचिनसोबत जे केलं ते…’, विराट कोहलीचं नाव घेत सेहवागचे मोठे विधान
विराट विश्वचषकात सर्वाधिक धावा करणार! जवळच्या मित्राने दिली हमी