क्रिकेट जगतातून मोठी बातमी समोर येत आहे. शुक्रवारी (दि. 22 सप्टेंबर) वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ घोषित झाला आहे. बाबर आझम याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने 15 सदस्यीय स्क्वॉडची घोषणा केली आहे. या संघात खराब फॉर्मचा सामना करत असलेला फखर जमान आणि शादाब खान यांनाही संधी मिळाली आहे.
आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत खराब प्रदर्शन केल्यानंतर असे म्हटले जात होते की, शादाब याला उपकर्णधारपदावरून हटवले जाऊ शकत. त्यालाही संघाबाहेर केले जाऊ शकते. मात्र, असे काहीच घडले नाहीये. दुसरीकडे, नसीम शाह दुखापतग्रस्त झाल्यामुळे वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेत खेळू शकणार नाही. त्याच्या जागी हसन अली याला संधी देण्यात आली आहे. हसन अली 15 महिन्यांनंतर संघात परतला आहे. त्याने अखेरचा सामना जून 2022मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. तसेच, नसीम शाह (Naseem Shah) याची अनुपस्थितीत पाकिस्तानसाठी मोठा धक्का मानली जात आहे.
🚨 JUST IN: Young speedster misses out as Pakistan announce their #CWC23 squad.
Details ⬇️https://t.co/9eRlEUELAu
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) September 22, 2023
पाकिस्तान संघात उसामा मीर याच्या रूपात एक अतिरिक्त लेग स्पिनरलाही सामील करण्यात आले आहे. या खेळाडूने वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध वनडे पदार्पण केले होते. मात्र, आशिया चषकाच्या संघात त्याला सामील केले गेले नव्हते. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजी ताफ्यात शाहीन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि मोहम्मद वसीम ज्युनिअर यांचा समावेश आहे. तसेच, मोहम्मद हॅरिस याला राखीव खेळाडूंमध्ये ठेवले आहे. फिरकी गोलंदाजी अष्टपैलू मोहम्मद नवाज यालाही संघात जागा मिळाली आहे. तसेच, फहीम अश्रफ याला संघात जागा मिळवता आली नाही.
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ-
फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, शादाब खान, उसामा मीर, मोहम्मद नवाज, शाहीन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनियर, हसन अली. (world cup 2023 pakistan team announced babar azam naseem shah shaheen afridi hasan ali read)
हेही वाचाच-
पाहावं ते नवलंच! Umpireच्या अंगात संचारला John Cena, त्याच्याच स्टाईलमध्ये फेटाळली गोलंदाजाची अपील- Video
मोठी बातमी! विश्वचषक 2023पूर्वी भारतीय दिग्गज बांगलादेशच्या गोटात, संघाकडून मिळाली सर्वात खास जबाबदारी