वनडे विश्वचषक स्पर्धेचा 13वा हंगाम भारतात पार पडणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी हाताच्या बोटांवर मोजण्याइतके दिवस उरले आहेत. येत्या 5 ऑक्टोबरपासून स्पर्धेचा घाट घातला जाणार आहे. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी आपण स्पर्धेतील संघ, ठिकाणं, शहरं आणि कुठे पाहता येईल अशा सर्व प्रश्नांची उत्तर या लेखातून जाणून घेणार आहोत. चला तर, सुरुवात करूयात…
विश्वचषक 2023 स्पर्धेविषयी सर्व माहिती (All Information About World Cup 2023)
विश्वचषकातील एकूण 10 संघ
वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेत एकूण 10 संघांचा समावेश असणार आहे. या 10 संघांमध्ये यजमान भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश यांचा समावेश आहे.
कुणी-कुणी घोषित केलाय संघ?
विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी 28 सप्टेंबरपूर्वी 15 सदस्यीय संघांची घोषणा करावे लागणार आहेत. आतापर्यंत एकूण 8 संघांनी 15 सदस्यीय स्क्वॉड घोषित केले आहे. यामध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, इंग्लंड आणि पाकिस्तान संघांचा समावेश आहे. श्रीलंका आणि बांगलादेश संघांनी अद्याप आपले स्क्वॉड घोषित केले नाहीये.
विश्वचषकासाठीची शहरं आणि ठिकाणं
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी 10 शहरं निश्चित केली गेली आहेत. अहमदाबाद, हैदराबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलकाता या शहरांचा त्यामध्ये समावेश आहे. तसेच, या 10 शहरांतील एकूण 10 ठिकाणांवर विश्वचषकातील 48 सामन्यांचे आयोजन होणार आहे.
या 10 स्टेडिअममध्ये नरेंद्र मोदी स्टेडिअम, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअम, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम, अरुण जेटली स्टेडिअम, एमए चिदंबरम स्टेडिअम, भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडिअम, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम, एम चिन्नास्वामी स्टेडिअम, वानखेडे स्टेडिअम आणि ईडन गार्डन्स यांचा समावेश आहे.
विश्वचषकातील महत्त्वाचे सामने
या स्पर्धेतील पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी गतविजेत्या इंग्लंड आणि न्यूझीलंड (England And New Zealand) संघात खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाईल. तसेच, स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी याच मैदानावर खेळला जाईल.
कुठे पाहता येणार स्पर्धा?
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10.30 आणि दुपारी 2 वाजता खेळले जाणार आहेत. ज्या दिवशी दोन सामने असतील, तेव्हा या वेळी सामने खेळले जातील. तसेच, ज्या दिवशी एक सामना असेल, त्या दिवशी 2 वाजता सामना खेळला जाईल. एकूण 45 दिवस खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेतील सर्व सामने टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स या वाहिनीवर दिसतील. तसेच, मोबाईलवर हॉटस्टार या ऍपवर सामन्यांची लाईव्ह स्ट्रीमिंग मोफत पाहता येईल. (World Cup 2023 Preview know all about Tournament)
हेही वाचाच-
कशी आहे विराटची World Cupमधील कामगिरी? 2 वर्ल्डकपमध्ये ठोकलंय शतक, वाचा लेखाजोखा
विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाची घोषणा, हुकमी एक्का बाहेर; 15 महिन्यांनंतर ‘या’ धुरंधराचे कमबॅक