पुढील वर्षी जून महिन्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचा होणारा अंतिम सामना री- स्केड्यूल केला जाऊ शकतो. आयसीसी क्रिकेट ऑपरेशन्सचे सरव्यवस्थापक जेफ अलार्डिस म्हणाले की, पुढे ढकलल्या गेलेल्या मालिकेचे वेळापत्रक पुन्हा कधी निश्चित केले जाईल यावर अंतिम सामना अवलंबून असेल.
कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) प्रादुर्भावामुळे संघांचे भविष्यातील वेळापत्रक पूर्णत: बिघडले आहे. टी२० विश्वचषकदेखील पुढे ढकलण्यात आला आहे. जेणेकरून सदस्य देश आपली द्विपक्षीय मालिका पूर्ण करतील. बांगलादेश, न्यूझीलंड, श्रीलंका, इंग्लंडसहित इतर देशांचीही द्विपक्षीय मालिका पुढे ढकलण्यात आली आहे.
अलार्डिस यांनी म्हटले, “नक्कीच हे सर्व संघ लवकरात लवकर आपल्या मालिकेचे वेळापत्रक ठरवतील. जेव्हा सर्व मालिका पूर्ण होतील, तेव्हा अंतिम सामन्याचे आयोजन होईल. आशा आहे की सर्व संघ अंतिम सामन्यांसाठी आम्हाला पुरेसा वेळ देतील. परंतु यावेळी अंतिम वेळापत्रकाची तारीख जून २०२१ आहे. सदस्य देशांच्या वेळापत्रकासाठी आपण थोडा जास्त वेळ थांबले पाहिजे.”
महत्त्वाच्या बातम्या-
-‘दादा’च्या ‘त्या’ एका फोनवर मिळाली गरीब कुटुंबाला मदत; झाली कोरोना चाचणी
-आयर्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघ जाहीर, ४ वर्षांनी दिग्गज खेळाडू करतोय कमबॅक
-ICC वर्ल्ड कप सुपरलीग: फ्रंटफूट नोबॉलवर असणार थर्ड अंपायरची करडी नजर, पहा आयसीसीचे नवे नियम
ट्रेंडिंग लेख-
-सर्वाधिक सलग कसोटी सामने खेळणारे ३ दिग्गज भारतीय क्रिकेटपटू
-आयपीएल खेळणारे हे ३ खेळाडू बजावू शकतात भारतीय संघासाठी अष्टपैलू खेळाडूची भूमिका…
-पहाटेचे ४.४५ झाले होते व त्यांची गाडी १० टन वजनाच्या गुरांच्या ट्रकला धडकली होती