---Advertisement---

इंग्लडच्या विजयाचा दुसऱ्याच संघाला फायदा, WTC गुणतालिकेत मोठा फेरबदल; भारताचं स्थान कितवं

On: सोमवार, सप्टेंबर 2, 2024 10:35 AM
England Test Squad
---Advertisement---

इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्स येथे खेळला गेला. हा सामना यजमांनानी चौथ्या दिवशीच गुंडाळला. इंग्लंडनं श्रीलंकेवर 190 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली. इंग्लंडच्या या विजयानंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट्स टेबलमध्ये बदल झाला आहे, ज्याचा फायद दुसऱ्या संघाला झाला.

या सामन्यात इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करताना 427 धावा फलकावर लावल्या होत्या. प्रत्युत्तरात, श्रीलंकेचा संघ 196 धावांवर गारद झाला. पहिल्या डावात इंग्लंडला 231 धावांची आघाडी मिळाली. यानंतर इंग्लंडनं दुसर्‍या डावात 251 धावा केल्या आणि श्रीलंकेसमोर विजयासाठी 483 धावांचं लक्ष्य ठेवलं. श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावात 292 धावांवर ऑलआऊट झाला.

श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवल्यानंतर इंग्लंडला 12 गुण मिळाले. यासह त्यांची गुणांची टक्केवारी 45 झाली. मात्र इंग्लंडच्या क्रमवारीत कोणताही बदल झाला नाही. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या टेबलमध्ये संघ अजूनही चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेनं सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर उडी मारली आहे. त्यांच्या गुणांची टक्केवारी 38.89 आहे. पराभवानंतर श्रीलंकेच्या संघाची सातव्या स्थानावर घसरण झाली.

डब्ल्यूटीसी पॉईंट टेबलमध्ये टॉप 3 मध्ये कोणताही बदल नाही. टीम इंडिया 74 गुणांसह प्रथम स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ 62.50 टक्के गुणांसह दुसर्‍या आणि न्यूझीलंड 50 टक्के गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे. या व्यतिरिक्त बांगलादेश सहाव्या, पाकिस्तान आठव्या आणि वेस्ट इंडिज शेवटच्या स्थानी आहे. 2023-25 सायकलच्या शेवटी गुणतालिकेतील टॉप 2 संघ फायनलसाठी पात्र ठरतील. अंतिम सामना जून 2025 मध्ये इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाईल.

हेही वाचा – 

16 वर्षीय फिरकीपटूची कमाल, क्रिकेटमधील 159 वर्ष जुना वर्ल्ड रेकॉर्ड मोडला!
प्रशिक्षक गंभीरने निवडली त्याची आवडती ‘ऑल टाइम इंडिया इलेव्हन’, चक्क रोहितला वगळले
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारत असेल विजयाचा दावेदार, कुणी केली भविष्यवाणी?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---