इंग्लंडनं तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा एक डाव 47 धावांनी पराभव केला. या विजयामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या पॉइंट टेबलमध्ये इंग्लंडला फारसा फायदा झाला नाही, मात्र पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे.
सध्याच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशीप सायकलमध्ये पाकिस्तानचा 8 सामन्यांतील हा 6वा पराभव आहे. या पराभवानंतर संघ तळाच्या 9व्या स्थानावर घसरला. सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तानपेक्षा वाईट स्थिती कोणत्याही संघाची नाही. पाकिस्तानच्या खात्यात आता केवळ 16.67 टक्के गुण आहेत.
पाकिस्तानवर विजय नोंदवल्यानंतर इंग्लंडच्या खात्यात 45.59 टक्के झाले. परंतु संघ चौथ्या स्थानावर कायम आहे. इंग्लंडच्या वर श्रीलंका आहे, ज्यांचे 55.56 टक्के गुण आहेत. भारतासोबत गतविजेता ऑस्ट्रेलिया टॉप-2 मध्ये आहे. टीम इंडिया सर्वाधिक 74.24 टक्के गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलिया 62.50 टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अब्दुल्ला शफीक, शान मसूद आणि आगा सलमान यांच्या शतकांच्या जोरावर पाकिस्ताननं 556 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, इंग्लंडनं हॅरी ब्रूकचं त्रिशतक आणि जो रुटच्या द्विशतकाच्या जोरावर 823 धावांवर डाव घोषित केला. पहिल्या डावानंतर 267 धावांची आघाडी घेतलेल्या इंग्लंडनं दुसऱ्या डावात यजमानांना 220 धावांवर रोखलं. अशाप्रकारे इंग्लंडनं हा सामना एक डाव आणि 47 धावांनी जिंकला.
या सामन्यातील पराभवासह पाकिस्तानच्या नावे एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. पाकिस्तान 147 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या इनिंगमध्ये 500 पेक्षा अधिक धावा करून डावानं पराभूत होणारा पहिला संघ ठरला आहे.
हेही वाचा –
‘संपूर्ण जग हसत…’, पाकिस्तानचा हा माजी दिग्गज बाबर आझमवर संतापला
पाकिस्तानची घरच्या मैदानावर फजिती, पहिल्या डावात 556 धावा करूनही लाजिरवाणा पराभव
‘आम्हाला भीती नाही…’, भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंडच्या कर्णधाराने रणशिंग फुंकला…