दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. जगभरात मागच्या काही वर्षांमध्ये योगाचे महत्व वाढले आहे आणि याच कारणास्तव योगा दिवस देखील साजरा केला जात आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ मिळवण्यासाठी योगाचा फायदा होतो. बुधवारी जागतिक योगा दिवसाची तयारी सध्या सर्वत्र सुरू झाली आहे. चला तर जाणून घेऊ योग दिवस आणि त्याच्या इतिहासाविषयी.
भारतात प्राचीन काळापासून लोक योगा करत आले आहेत. कालांतराने विदेशात देखील योगाचा प्रसार झाला आणि आज जगभरात योगा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. असे असले तरी, योगाला जगातिक पातळीवर खऱ्या अर्थाने महत्व मिळाले कोरोना काळात. कारण त्यावेली सर्वत्र ताळेबंदी लादली गेली होती. लोकांना घराबाहेर पडता येत नव्हते. सर्वांचा व्यायाम बंद पडला होता. असात घरात बसून अनेकांना नैराश्याचा सामना करावा लागाल. या अडचणीच्या काळात योगामुळे अनेकांना मदत मिळाली. तत्पूर्वी 2015मध्येच जागतिक योगा दिनाची सुरुवात झाली होती.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 27 सप्टेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रांसमोर जागतिक योगा दिवस (World Yoga Day) साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पंतप्रथान नरेंद्र मोदी यांचा हा प्रस्तावाला संयुक्त राष्ट्र संघटनेकडून मान्य केला गेला. अवघ्या तीन महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या आयोजनाची घोषणा करण्यात आली. पुढच्या वर्षी म्हणजेच 2015 मध्ये पहिल्यांता आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला गेला.
संयुक्त राष्ट्रांकडून 21 जून रोजी योग दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला. पण 21 जूनलाच योग दिवस का? असा प्रश्नही अनेकांना पडतो. यामागे एक खास कारण आहे. 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे. या दिवसानंतर सूर्य दक्षिणायनात असतो. असे मानले जाते की सूर्य दक्षिणायनचा काळ आध्यात्मिक सिद्धी प्राप्त करण्यासाठी फायदेशीर असतो. याच कारणास्तव 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाऊ लागला.
21 जून 2015 रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करताना दिल्लीतील राजपथवर विश्वविक्रम झाला. यादिवशी 35 हजारपेक्षा जास्त लोक योगा करण्यासाठी एकत्र आले होते. विशेष म्हणजे एकूण 84 देशांचे प्रतिनिधी यामध्ये सामील होोते. यावेळी 21 योगासनांचा अभ्यास केला गेला होता. (World Yoga Day 2023. When and how Yoga Day started, know the history)
महत्वाच्या बातम्या –
मियाँदादने भारताविरुद्ध पुन्हा ओकली गरळ! विधानाने 140 कोटी भारतीयांच्या तळपायाची आग जाईल मस्तकात
आख्ख्या जगाने साजरा केला ‘फादर्स डे’, पण गेलकडून वडिलांना मिळालं सगळ्यात भारी गिफ्ट; एक नजर टाकाच