साउथँम्पटन। आज(22 जून) आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकात 28 वा सामना भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात होणार आहे. हा सामना साउथँम्पटन येथील द रोज बॉल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भारतीय संघाने या सामन्यासाठी 11 जणांच्या संघात आज एक बदल केला आहे. आज भारतीय संघांच्या 11 जणांमध्ये दुखापतग्रस्त भुवनेश्वर कुमार ऐवजी मोहम्मद शमीला संधी देण्यात आली आहे.
त्याचबरोबर अफगाणिस्तानच्या 11 जणांच्या संघात नूर अली ऐवजी हजरतूल्लहा झझाईला तर दवलत झादरन ऐवजी अफताब आलमला संधी देण्यात आली आहे.
भारत आणि अफगाणिस्तान हे संघ विश्वचषकात पहिल्यांदाच आमने-सामने येणार आहेत.
या विश्वचषकात भारतीय संघाने आत्तापर्यंत 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर 1 सामना पावसामुळे रद्द झाला आहे. तसेच अफगाणिस्तान संघाने अजून या विश्वचषकात एकही सामना जिंकलेला नाही.
असे आहेत 11 जणांचे संघ –
भारत – केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), विजय शंकर, एमएस धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, केदार जाधव, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.
अफगाणिस्तान – हजरतुल्लाह झझाई, गुलबदीन नाईब (कर्णधार), रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी, असगर अफगान, मोहम्मद नबी, इक्रम अली खिल (यष्टीरक्षक), नजीबुल्लाह झद्रान, रशीद खान, अफताब आलम, मुजीब उर रहमान
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–टॉप ५: भारत-अफगाणिस्तान सामन्यात हे खास ५ विक्रम करण्याची भारतीय खेळाडूंना संधी
–किंग कोहलीला सचिन-लाराचा विश्वविक्रम मागे टाकत इतिहास घडवण्याची आज सुवर्णसंधी
–संगकाराने व्यक्त केला मोठा विश्वास, हा भारतीय खेळाडू मोडू शकतो त्याचा खास विश्वविक्रम