मँचेस्टर। आज(16 जून) 2019 विश्वचषकात 22 वा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान संघात होणार आहे. ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणाऱ्या या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात एकच बदल करण्यात आला आहे. शिखर धवन अंगठ्याच्या दुखापतीमुळे आजच्या सामन्याला मुकणार आहे. त्याच्याऐवजी आज सलामीला केएल राहुल उतरेल. तसेच शिखरच्या ऐवजी आज विजय शंकरला 11 जणांच्या भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.
त्याचबरोबर पाकिस्तानने आज दोन बदल करताना शादाब खान आणि इमाद वासीम यांना 11 जणांच्या संघात संधी दिली आहे.
या सामन्याआधी भारतीय संघाने दोन विजय मिळवले आहेत. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. तसेच पाकिस्तान संघाने एका सामन्यात विजय, दोन सामन्यात पराभव स्विकारले आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानचा एक सामनाही पावसामुळे रद्द झाला आहे.
असे आहेत 11 जणांचे संघ –
भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, विजय शंकर, एमएस धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युजेंद्र चहल, जसप्रीत बुमराह
पाकिस्तान – सरफराज अहमद (कर्णधार/यष्टीरक्षक),इमाम-उल-हक, फखार जामन, बाबर आझम, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, इमाद वासीम, शदाब खान, हसन अली, वहाब रियाज, मोहम्मद अमीर.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषक २०१९: किंग कोहलीला वनडे क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम रचण्याची आज सुवर्णसंधी
–वॉर्नरने त्याच्यामुळे दुखापतग्रस्त झालेल्या या गोलंदाजाला दिली खास भेट, पहा व्हिडिओ
–चाचा शिकागो यांनी मानले एमएस धोनीचे आभार, जाणून घ्या कारण