मँचेस्टर। 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकात रविवारी(16 जून) भारत विरुद्ध पाकिस्तान संघात 22 वा सामना ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 89 धावांनी विजय मिळवला. हा भारताचा या विश्वचषकातील तिसरा विजय ठरला आहे.
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 336 धावा करत पाकिस्तानसमोर विजयासाठी 337 धावांचे आव्हान ठेवले. परंतू नंतर पावसाच्या व्यत्ययामुळे हे आव्हान डकवर्थ लुईस नुसार 40 षटकात 302 धावा असे करण्यात आले.
या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला 40 षटकात 6 बाद 212 धावाच करता आल्या. पाकिस्तानकडून फखर जमान(62) आणि बाबर आझमने(48) चांगली खेळी केली. परंतू अन्य फलंदाजांनी नियमित कालांतराने विकेट गमावल्याने पाकिस्तानला सामनाही गमवावा लागला. भारताकडून विजय शंकर, कुलदीप यादव आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
तत्पूर्वी या सामन्यात भारताकडून रोहित शर्माने 140 धावांची शतकी खेळी केली. त्याचबरोबर केएल राहुलने 57 आणि विराट कोहलीने 77 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे भारताला 336 धावांचा डोंगर उभा करता आला. तसेच पाकिस्तानकडून मोहम्मद अमिरने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.रोहितला या सामन्याचा सामनावीर घोषित करण्यात आले.
या सामन्यातील विजयाबरोबरच भारतीय संघाने तसेच खेळाडूंनी अनेक विक्रमांनाही गवसणी घातली आहे.
त्यातील हे काही खास विक्रम –
#1. इंग्लंडमध्ये जलद 1 हजार धावा करणारे परदेशी खेळाडू
18 डाव- रोहित शर्मा
19 डाव- शिखर धवन
#2. रोहित शर्माच्या विश्वचषकातील शेवटच्या 5 खेळी – 140, 57, 122*, 34, 137
#3. पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकातील सर्वोत्तम खेळी –
143* – अँड्र्यू सायमंड
140 – रोहित शर्मा
131*- रॉस टेलर
#4. रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्ध केलेली 140 धावांची खेळी ही भारतीय खेळाडूने पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात केलेली सर्वोत्तम खेळी आहे. यापुर्वी विराटने 2015 मध्ये 107 धावांची खेळी केली होती.
#5. विश्वचषकात 300 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्यावर भारतीय संघ कधीही पराभूत झाला नाही.
#6. गेल्या 14 पुर्ण झालेल्या सामन्यातील पाकिस्तानची कामगिरी – पराभव, पराभव, पराभव, पराभव, पराभव, पराभव, पराभव, पराभव, पराभव, पराभव, पराभव, विजय, पराभव, पराभव
#7. भारताने पाकिस्तानला विश्वचषकात 7 पैकी 7 वेळा पराभूत केले आहे. तसेच टी20 विश्वचषकात 5 पैकी 5 वेळा पराभूत केले आहे.
#8. विश्वचषकात एखाद्या प्रतिस्पर्ध्याबरोबर एकही पराभव न पहाता सर्वाधिक विजय मिळवणारे संघ
-भारत विरुद्ध पाकिस्तान- 7 विजय (भारत)
-पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका- 7 विजय (पाकिस्तान)
-विंडीज विरुद्ध झिंबांब्वे- 6 विजय (विंडीज)
#9. विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान-
1992 – विजयी भारत
1996 – विजयी भारत
1999 – विजयी भारत
2003 – विजयी भारत
2011 – विजयी भारत
2015 – विजयी भारत
2019 – विजयी भारत
#10. विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात सामनावीर –
1992 – सचिन तेंडुलकर
1996 – नवज्योत सिंग सिद्धु
1999 – व्यंकटेश प्रसाद
2003 – सचिन तेंडुलकर
2011 – सचिन तेंडुलकर
2015 – विराट कोहली
2019 – रोहित शर्मा
#11. वनडेत जलद 11 हजार धावा करणारे खेळाडू
222 डाव – विराट कोहली
276 डाव – सचिन तेंडुलकर
286 डाव- रिकी पाॅटिंग
288 डाव – सौरव गांगुली
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–टीम इंडियाला मोठा धक्का; धवन नंतर आता हा खेळाडू पडला पुढील सामन्यांतून बाहेर
–विश्वचषक २०१९: भारताचा पाकिस्तानवर ८९ धावांनी दणदणीत विजय
–भारतीय संघाला जोरदार धक्का; हा खेळाडू पडला उर्वरित सामन्यातून बाहेर