टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली गेल्या 12 महिन्यांत सर्वाधिक मानधन घेणारा क्रिकेटपटू आहे. कोहलीनं गेल्या एका वर्षात मानधनाचे सर्व रेकॉर्ड मोडले. मात्र तो अजूनही स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोपासून बराच मागे आहे. रोनाल्डोचं मानधन कोहलीपेक्षा दुप्पटीनं जास्त आहे.
‘स्टॅटिस्टा’च्या अहवालानुसार, विराट कोहलीनं गेल्या 12 महिन्यांत एकूण 847 कोटी रुपये मानधन घेतलं. ही आकडेवारी 1 सप्टेंबर 2023 ते 1 सप्टेंबर 2024 दरम्यानची आहे. या काळात ख्रिस्टियानो रोनाल्डो जगातील सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू आहे. त्यानं गेल्या 12 महिन्यांत 2081 कोटी रुपये मानधन घेतलं.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर स्पेनचा दिग्गज गोल्फपटू जॉन रहम आहे. त्यानं गेल्या एका वर्षात 1712 कोटी रुपये मानधन घेतलं. अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेसी तिसऱ्या क्रमांकावर असून त्यानं 1074 कोटी रुपयांचं मानधन घेतलंय. विराट कोहली या लिस्टमध्ये 9व्या क्रमांकावर आहे. टॉप 10 सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो एकमेव क्रिकेटपटू आहे.
जगातील सर्वाधिक मानधन घेणारे खेळाडू (आकडेवारी रुपयांमध्ये)
ख्रिस्तियानो रोनाल्डो (फुटबॉल) – 2,081 कोटी
जॉन रहम (गोल्फ) – 1712 कोटी
लिओनेल मेस्सी (फुटबॉल) – 1,074 कोटी
लेब्रॉन जेम्स (बास्केटबॉल) – 990 कोटी
किलियन एमबाप्पे (फुटबॉल) – 881 कोटी
जियानिस अँटेटोकोनम्पो (बास्केटबॉल) – 873 कोटी
नेमार (फुटबॉल) – 864 कोटी
करीम बेंझेमा (फुटबॉल) – 864 कोटी.
विराट कोहली (क्रिकेट) – 847 कोटी
स्टीफन करी (बास्केटबॉल) – 831 कोटी
विशेष म्हणजे, विराट कोहली हा भारतातील सर्वात जास्त टॅक्स भरणारा क्रिकेटपटू आहे. गेल्या आर्थिक वर्षात त्यानं एकूण 66 कोटी रुपये टॅक्स भरला. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महेंद्रसिंह धोनीनं 38 कोटी रुपये टॅक्स भरला आहे. यानंतर सचिन तेंडुलकर (28 कोटी), सौरव गांगुली (23 कोटी) आणि हार्दिक पांड्या (13 कोटी) यांचा क्रमांक लागतो.
हेही वाचा –
उंच उडीत प्रवीणची सुवर्ण कामगिरी! भारतानं जिंकलं सहावं गोल्ड मेडल
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटसोबत कट झाला होता? राजकारणात प्रवेश केल्यानंतर दिलं सूचक उत्तर
भारत विरुद्ध बांगलादेश मालिका कधीपासून सुरू होणार? कोणत्या चॅनलवर दिसतील लाईव्ह सामने?