सध्या सर्वत्र टी-२० विश्वचषक आणि आशिया कपची चर्चा असली तरी दुसरीकडे मात्र, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप सुरू आहे. ज्याचा अंतिम सामना पुठच्या वर्षी खेळवला जाणार आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोणकोणते दोन संघ आमनेसामने असतील यावरून अनेक दिग्गज तर्क वितर्क लावत आहेत. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनने एक मोठे विधान केले आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू शेन वॉटसनचे म्हणणे आहे की, “भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक मॅचविनर आहेत आणि हे दोन संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डबल्यूटीसी)च्या अंतिम फेरीसाठी पात्र होण्याच्या जवळ आले नाहीत तर मी आश्चर्यचकित होईल.” सध्याच्या डब्ल्यूटीसी स्पर्धेचा अंतिम सामना पुढील वर्षी खेळवला जाणार आहे आणि लीग टेबलमधील पहिल्या दोन स्थानांमध्ये स्थान मिळविण्याची शर्यत अधिक तीव्र झाली आहे. वॉटसनने ‘द आयसीसी रिव्ह्यू’ला सांगितले की, “तुम्ही भारत आणि पाकिस्तानला शर्यतीतून कधीच बाहेर ठेवू शकत नाही कारण त्यांच्याकडे घराबाहेरही बरेच मॅच-विनर्स आहेत. ते पात्रतेच्या जवळ आले नाहीत तर मला आश्चर्य वाटेल.”
अंतिम फेरीत प्रवेश करणार्या दोन संघांचा अंदाज वर्तविण्यास विचारले असता वॉटसन म्हणाला की, “मी सध्या ज्या प्रकारे पाहतो, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे प्रबळ दावेदार आहेत. ते दोघे खरोखर चांगले क्रिकेट खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या कसोटीखेरीज चांगले क्रिकेट खेळले जेथे त्यांना शेवटच्या डावात फिरकीला अनुकूल परिस्थितीत बाद केले गेले.” ऑस्ट्रेलियासाठी ५९ कसोटी खेळलेल्या वॉटसनला डबल्यूटीसी उशिरा सुरू झाल्याबद्दल खेद आहे.
“होय, माझी इच्छा आहे की मी त्यात (डबल्यूटीसी ) खेळलो असतो. माझ्या खेळण्याच्या दिवसातही कसोटी क्रिकेटमध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सुरू करण्याबाबत बरीच चर्चा झाली होती. ते अंमलात आणण्यासाठी खूप वेळ लागला आणि दुर्दैवाने मी ते चुकलो.” असंही पुढे बोलताना वॉटसन म्हणाला.
वॉटसन म्हणाला की, “२००५ मध्ये ऑस्ट्रेलियात वर्ल्ड इलेव्हन विरुद्ध ‘सुपर टेस्ट’ खेळण्यासाठी मी खूप भाग्यवान होतो, जे खूप खास होते. मी खेळलेल्या पहिल्या कसोटी सामन्यांपैकी हा एक होता. त्याचा भाग बनणे विशेष होते पण ते आहे. त्याहूनही मोठा, आयसीसी स्पर्धा जिंकणे आणि तेही कसोटी क्रिकेटमध्ये.”
सध्या, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया डबल्यूटीसी टेबलमध्ये पहिल्या दोन स्थानांवर आहेत. त्यानंतर श्रीलंका, भारत आणि पाकिस्तानचा क्रमांक लागतो. गत हंगामातील उपविजेता भारत त्यांच्या उर्वरित सहा पैकी चार डबल्यूटीसी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचे यजमानपद भूषवेल तर उर्वरित दोन बांगलादेशविरुद्ध असतील. दुसरीकडे, पाकिस्तानला आपले उर्वरित पाच सामने घरच्या मैदानावर खेळायचे आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
डॉ.प्रमोद मुळे स्मृती करंडक पुणे जिल्हा मानांकन अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत 474 खेळाडू सहभागी
दीपक चाहरला संघाबाहेर ठेवल्याने चाहते संतापले! म्हणाले; ‘देख रहा है दीपक, कैसे…’
VIDEO। मुंबईच्या रस्त्यावर ‘विरुष्काची’ स्कूटर राईड! फॅन्स पासून वाचण्यासाठी वापरली खास आयडिया