इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनने नुकतेच इंग्लंडच्या संघाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. तसेच त्याची भारताविरुद्ध आज, 3 जुलै पासुन सुरु होणाऱ्या टी20 मालिकेसाठी इंग्लंडच्या संघातही निवड झाली आहे.
सॅम हा कौंटी क्रिकेटमध्ये सरे संघाकडून खेळतो. तसेच भारतीय कर्णधार विराट कोहलीही यावर्षी सरेकडून कौंटी क्रिकेट खेळणार होता. त्यामुळे सॅम जून महिन्यात विराटबरोबर खेळायला मिळणार म्हणून खुष होता.
पण विराटला मानेच्या दुखापतीमुळे कौंटी क्रिकेट खेळता आले नाही. यामुळे सॅमलाही विराटबरोबर संघसहकारी म्हणून खेळण्याची संधी गमवावी लागली.
याबद्दल सांगताना सॅम म्हणाला, “विराट हा माझा सरे संघामध्ये संघसहकारी म्हणून येणार असल्याने मी खूप उत्साही होतो. मला अपेक्षा होती की मला अन्य कौंटी संघाच्या गोलंदाजांवर विराटला गोलंदाजी करावी लागेल म्हणून हसायला मिळेल.”
“सध्या कोहलीला गोलंदाजी करणे म्हणजे बाकीच्या संघांनी इंग्लंडमध्ये कशी गोलंदाजी करावी याचा विचार करण्यासारखे आहे. ते सगळे खास आहेत. विशेषत: या खेळपट्टीवर.”
त्याचबरोबर सॅमने सांगितले की त्याचे सरे संघातील संघसहकारीही विराट सरेकडून खेळणार म्हणून उत्साही होते. पण त्याला दुखापत झाल्याने सर्व निराश झाले.
याविषयी त्याने सांगितले, “तूम्हाला अशा दिग्गज खेळाडूंबरोबर खेळायचे असते. जेणे करुन तूम्ही स्वत: च्या खेळाचे परीक्षण करु शकता आणि आपल्याला सुधारण्याची आवश्यकता कुठे आहे ते शोधू शकतो.”
” त्याच्या न येण्याने सरेचे खेळाडू नाराज झाले होते कारण आम्ही मोठ्या प्रेक्षकवर्गाची अपेक्षा केली होती. तसेच तो कसा सराव करतो हे शिकायला मिळणार होते. तो जिममध्येही घाम गाळतो. त्यामुळे त्याच्या सोबत खेळणे खास असणार होते.”
तसेच सॅम असेही म्हणाला की, “जर मला आता संधी मिळाली तर मला त्याची विकेट घेण्याची संधी मिळणार आहे. हे सर्व मजेदार असेल”
आज होणाऱ्या पहिल्या टी20 सामन्याने भारताच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारत इंग्लंड विरुद्ध 3 टी20 सामने, 3 वनडे सामने आणि 5 कसोटी सामने होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–होय, किंग कोहलीला साहेब घाबरले आहेत…
–ब्लाॅग: आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये आशियायी क्रिकेटर्सची उपेक्षाचं?
–भारतीय अ संघाने इंग्लंडला इंग्लंडमध्ये लोळवले; जिंकली तिरंगी मालिका