---Advertisement---

‘जर रोहित शर्मा मुंबईचा कर्णधार असता, तर मी…’, सुरेश रैनाचं स्टेटमेंट तुफान व्हायरल

On: गुरूवार, डिसेंबर 21, 2023 11:43 AM
Suresh-Raina-And-Rohit-Sharma
---Advertisement---

Suresh Raina Video: इंडियन प्रीमिअर लीग 2024 हंगामाचा लिलाव पार पडला आहे. संपूर्ण 10 संघांचे स्क्वॉड तयार झाले आहेत. आयपीएल लिलावापूर्वी मॉक ऑक्शन (तोंडी लिलाव) झाले होते. यामध्ये भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरेश रैना यानेही भाग घेतला होता. यादरम्यान त्याने मुंबई इंडियन्सकडून बोली लावण्यास सांगितले, तेव्हा त्याने असे काही उत्तर दिले, जे आता व्हायरल होत आहे.

सुरेश रैना (Suresh Raina) याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रैनाने म्हटले आहे की, जर रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाचा कर्णधार असता, तर त्याने मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा झेंडा पकडला असता. खरं तर, आयपीएल 2024 लिलावाला सुरुवात होण्यापूर्वीच मुंबईने रोहितच्या जागी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला कर्णधार म्हणून नेमले होते. याविषयी मोठा वादंगही झाला होता.

मुंबई इंडियन्स संघाच्या निर्णयानंतर अशा बातम्या समोर आल्या होत्या की, रोहित आयपीएल 2024 हंगामात इतर संघाकडून खेळू शकतो. आयपीएल 2024 लिलावानंतर खेळाडूंना ट्रेड करण्याची विंडो खुली करण्यात आली आहे. अशात माध्यमांमध्ये वृत्त आहे की, रोहित इतर संघांकडून खेळताना दिसू शकतो.

सुरेश रैनाचे विधान
खरं तर, पार्थिव पटेल याने जिओ सिनेमाच्या एका शोमध्ये जेव्हा सुरेश रैना याला मुंबईचा झेंडा दिला, तेव्हा रैनाने म्हटले की, “मी हे पकडले असते, जर रोहित शर्मा संघाचा कर्णधार असता.” रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने 5 आयपीएल किताब जिंकले आहेत. अशात रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यामुळे मुंबईचे चाहते खुश नाहीयेत. आयपीएल 2024 लिलावापूर्वी गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात हार्दिकबाबत पूर्ण रोख करार झाला होता.

हार्दिक यशस्वी कर्णधार
खरं तर, हार्दिक पंड्या 2021पर्यंत मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात मुंबईने पंड्याला रिलीज केले होते. तसेच, त्यानंतर पंड्याला गुजरात टायटन्स संघाने खरेदी करत कर्णधार बनवले होते. हार्दिकच्या नेतृत्वात गुजरातने आयपीएल 2022चा किताब जिंकला होता. तसेच, आयपीएल 2023मध्ये गुजरात उपविजेता ठरला होता. आता आगामी हंगामात हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (would have caught the flag of mumbai indians if rohit sharma was the captain former cricketer suresh raina video viral)

हेही वाचा-
रोहितला हटवून पंड्याला कर्णधार बनवण्याविषयी ग्लोबल हेडचे लक्षवेधी भाष्य; म्हणाला, ‘खरं सांगतो, हे खूपच…’
पुन्हा खुली झाली IPL Trading Window, जाणून घ्या A to Z नियम, रोहित अजूनही सोडू शकेल MIची साथ?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---