महिला प्रीमियर लीग 2024साठी बीसीसीआयने शनिवारी (9 डिसेंबर) खेळाडूंचा लिलाव आयोजित केला. या लिलावात काही विदेशी आणि भारतीय खेळाडूंनी कोट्यावधी रुपये कमावले. यातीलच एक अनकॅप्ड खेळाडू वृंदा दिनेश हिला 1.30 कोटी रुपयांमध्ये युपी वॉरिअर्स संघात दाखल झाली.
महिला प्रीमियर लीग (WPL 2024) म्हणजेच डब्ल्यूपीएलचा दुसरा हंगाम पुढच्या वर्षी खेळला जाणार आहेत. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2024 पूर्वीच डब्ल्यूपीएल स्पर्धा खेळवली जाऊ शकते. फेब्रुवारी महिन्यात ही स्पर्धा आयोजित केली जाईल, असा अंदाज सध्या व्यक्त होत आहे. बीसीसीआय महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने मागच्या वर्षीपासून ही स्पर्धा आयोजित करत आहे. काही अनकॅप्ड भारतीय खेळाडूंना डब्ल्यूपीएलच्या माध्यमातून एक मोठी संधी मिळते. कर्नाटकची ही सलामीवीर फलंदाज भारत अ संगासाठी खेळली आहे. पण अद्याप भारतासाठी पदार्पणाची संधी दिली मिळाली नव्हते.
शनिवारी मुंबईत डब्ल्यूपीएल लिलाव आयोजित केला गेला. 10 लाख बेस प्राईजसह लिलिवात उतरलेली वृंदा आरसीबी, गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरिअर्स यांच्यातील स्पर्धेमुळे 1.30 कोटी रुपयांमध्ये यूपी संघात सामील झाली. (WPL 2023 Auction Vrinda Dinesh is sold to UP Warriorz for INR 1.3 crore.)
महत्वाच्या बातम्या –
WPL 2024 Auction: बेस प्राईज 30 लाख, पण मिळाले 1 कोटी, ‘ही’ जबरदस्त खेळाडू गुजरातच्या ताफ्यात
Jio Cinema नाही, तर ‘इथे’ घेऊ शकता IND vs SA टी20 मालिकेचा आनंद, करावा लागणार नाही रुपयाही खर्च