बीसीसीआयने इंडियन प्रीमिअर लीगच्या धर्तीवर महिला प्रीमिअर लीग स्पर्धा सुरू केली. आता ही स्पर्धा मधल्या टप्प्याकडे जात आहे. 5 संघांत खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेतील 7 सामने पार पडले आहेत. प्रेक्षकांकडूनही या स्पर्धेला तुफान प्रतिसाद मिळत आहे. तसेच, ते स्पर्धेत घडणाऱ्या रोमांचक क्षणांचे साक्षीदार बनत आहेत. अशातच स्पर्धेतील सातव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स महिला संघाची स्टार खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज हिने घेतलेला अफलातून झेल पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. तिच्या झेलाचा व्हिडिओही तुफान व्हायरल होत आहे.
महिला प्रीमिअर लीग 2023 (Womens Premier League 2023) स्पर्धेतील सातवा सामना दिल्ली कॅपिटल्स महिला विरुद्ध मुंबई इंडियन्स महिला (Delhi Capitals Women vs Mumbai Indians Women) संघात पार पडला. हा सामना मुंबईने एकहाती 8 विकेट्सने जिंकला. मात्र, सामन्यादरम्यान सर्वांचे लक्ष वेधण्याचे काम जेमिमा रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) हिने वेधले.
जेमिमाने झेप घेत पकडला शानदार झेल
ही घटना सामन्याच्या 12व्या षटकात पाहायला मिळाली. 30 चेंडूत 32 धावांवर खेळणारी मुंबई इंडियन्स संघाची सलामीवीर हेली मॅथ्यूज हिने या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू तिच्या बॅटवर व्यवस्थित आला नाही. तसेच, चेंडू मिडऑफच्या दिशेने गेला. तिकडे, चेंडू उडल्याचे पाहून डीपमध्ये उभ्या असलेल्या जेमिमाने धाव घेत चेंडूवर नजर कायम ठेवली. यावेळी चेंडू जसा खाली येऊ लागला, तेव्हा तिने शानदार डाईव्ह मारत अफलातून झेल घेतला. यावेळी तिची चपळाई पाहून प्रेक्षकांनाही तोंडात बोटे घातली.
शेवटी मॅथ्यूजला शानदार खेळीनंतर तंबूत जावे लागले. यानंतर नॅट सायव्हर- ब्रंट हिने 23 आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने नाबाद 11 धावा चोपत संघाला 8 विकेट्सने शानदार विजय मिळवून दिला.
गुणतालिकेत दिल्ली दुसऱ्या स्थानी
या सामन्यातील पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. दिल्लीकडे 3 सामन्यात 2 विजय आणि 1 पराभवासह 4 गुण झाले आहेत. दुसरीकडे, मुंबई इंडियन्स संघाचे 3 पैकी 3 सामने जिंकत 6 गुणांसह गुणतालिकेतील अव्वलस्थान पटकावले आहे. अशात आगामी सामन्यात दिल्ली कशाप्रकारे पुनरागमन करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दिल्लीचा पुढील सामना 11 मार्च रोजी गुजरात जायंट्सविरुद्ध होणार आहे. (wpl 2023 cricketer jemimah rodrigues flying in the air and caught stunning catch see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘ख्वाजाने मालिकेत जबरदस्त प्रदर्शन केले…’, भारतीय दिग्गजाचे मोठे विधान
टीम इंडियाच्या गोलंदाजीची पिसे काढत ऑस्ट्रेलियाच्या कॅमरुन ग्रीनने बनवला मोठा रेकॉर्ड, स्वप्नही झाले पूर्ण





