---Advertisement---

अखेर WPL मध्ये आरसीबीची बोहनी! युवा कनिका आणि पेरी ठरल्या पहिल्या विजयाच्या शिल्पकार

---Advertisement---

वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये बुधवारी (15 मार्च) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध युपी वॉरियर्झ असा सामना खेळला गेला. स्पर्धेतील आपला पहिला विजय शोधत असलेल्या आरसीबी संघाने या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. युपीला पाच विकेट्सने पराभूत करत त्यांनी आपल्या गुणांचे खाते उघडले. युवा फलंदाज कनिका आहुजा ही या विजयाची शिल्पकार ठरली.

 

स्पर्धेतील पहिले पाचही सामने गमावलेल्या आरसीबीसाठी या सामना करो वा मरो असा होता. तर युपी संघ आपला तिसरा विजय मिळवण्याचा इराद्याने मिळवण्यात उतरला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या आरसीबीसाठी हा निर्णय योग्य ठरला. सोफी डिवाईनने पहिल्या षटकात हिली व देविका वैद्य या युपीच्या दोन्ही सलामीवीरांना तंबूत पाठवले. तर, दुसऱ्या षटकात मेगन शूटने मॅकग्राला बाद केले. तीन बाद पाच या अवस्थेतून किरण नवगिरेने आक्रमक 22 धावा केल्या. ग्रेस हॅरिस व दीप्ती शर्मा यांनी 69 धावांची भागीदारी करत युपीला पुन्हा एकदा सामन्यात आणले. हॅरिसने 46 धावा केल्याने 135 पर्यंत मजल मारता आली. आरसीबीसाठी पेरीने सर्वाधिक तीन बळी मिळवले.

आरसीबीची सुरुवात देखील तितकी चांगली झाली नाही. डिवाईन 4 चेंडूत 14 धावा करत बाद झाल्यानंतर, कर्णधार स्मृती मंधाना दुसऱ्या षटकात शून्यावर बाद झाली. पेरीदेखील केवळ 10 धावा करु शकली. हिदर नाईटने 24 धावांचे योगदान दिले. ती बाद झाल्यानंतर युवा कनिका आहुजाने जबाबदारी घेत आक्रमक 46 धावा चोपल्या. रिचा घोषने अखेरपर्यंत नाबाद राहत 31 धावा करत संघाला पहिला विजय मिळवून दिला.

(WPL 2023 RCB Register First Win In Tournament After Beating UP Warriorz By 5 Wickets Kanika Ahuja Elyse Perry Shines)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ट्विटरवर अडचणीत सापडला अश्विन! थेट एलॉन मस्कला टॅग करत मागितला सल्ला, नक्की काय घडलंय वाचाच
महिला कुस्तीपटूंसाठी खूशखबर! ‘या’ तारखेला रंगणार पहिल्या ‘महिला महाराष्ट्र केसरी’चा थरार 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---