महिला प्रीमियर लीग 2024 मधील दुसऱ्या हंगामात दिल्ली कॅपिट्ल्स टीमने विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वूमन्स टीमची विजयी घोडदौड थांबवली आहे. तसेच या सामन्यात . दिल्ली कॅपिट्ल्सने आरसीबीला विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 195 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानचा पाठलाग करताना कॅप्टन स्मृती मंधाना हीने तडाखेदार खेळी केली आहे. मात्र इतर फलंदाजांनी खराब कामगिरी केल्यामुळे दिल्लीचा विजय झाला आहे.
याबरोबरच आरसीबीला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 169 धावाच करता आल्या आहेत. तसेच आरसीबीचा हा यंदाच्या हंगामातील पहिला पराभव ठरला आहे. आरसीबीने 195 धावांचा पाठलाग करताना तडाखेदार सुरुवात केली. कॅप्टन स्मृती मंधाना आणि सोफी डेव्हाईन या दोघांनी 77 धावांची सलामी भागीदारी केली होती. त्यामुळे स्मृतीच्या फटकेबाजीच्या जोरावर आरसीबीने झटपट 100 धावांचा टप्पा पार केला होता.
पण मारिझान कॅप हीने स्मृतीला 74 धावांवर क्लिन बोल्ड करत सामना आपल्या बाजूने फिरवला होता. त्यानंतर स्मृतीनंतर सभिनेनी मेघना हीने 36 धावा केल्या. तर विकेटकीपर रिचा घोष हीने 19 धावा केल्या. त्यानंतर मात्र आरसीबीच्या शेवटच्या फलंजाजंनी सपशेल निराशा केली. आशा शोभना झिरोवर आऊट झाली. तर श्रेयांका पाटील 1 धावेवर नाबाद परतली. तर इतरांनी आपली विकेट गिफ्ट देऊन माघारी परतल्या आहेत.
Turning point.
This moment.
This wicket. pic.twitter.com/SyQsJO5C1O— Delhi Capitals (@DelhiCapitals) February 29, 2024
दरम्यान, दिल्लीकडून शफली वर्मा हीने 50 धावा केल्या. ॲलिस कॅप्सी हीने 46 धावा जोडल्या. मारिझान काप हीने 32 धावांचं योगदान दिलं. तर जोनासेन आणि अरुंधती रेड्डी या दोघींनी अखेरीस निर्णायक खेळी केली. जोनासेन नाबाद 36 आणि अरुधंती रेड्डी हीने 10 धावा केल्या. तर आरसीबीकडून एस डेविने आणि नदिन डी क्लर्क या दोघींनी 2-2 विकेट्स घेतल्या आहेत.
दिल्ली कॅपिटल्स वूमन्स प्लेईंग इलेव्हन | मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲलिस कॅप्सी, मारिझान कॅप, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी, तानिया भाटिया (विकेटकीपर), राधा यादव आणि शिखा पांडे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वूमन्स प्लेईंग इलेव्हन | स्मृती मंधाना (कॅप्टन), सोफी डेव्हाईन, सभिनेनी मेघना, नदिन डी क्लर्क, रिचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेरेहम, सोफी मोलिनक्स, श्रेयंका पाटील, सिमरन बहादूर, आशा शोभना आणि रेणुका ठाकूर सिंग.
महत्वाच्या बातम्या –
- हार्दिक पांड्याने पदार्पण केल्यापासून फ्रेंचायझीसाठी खेळला जवळजवळ 89% आयपीएल सामने, अन् पाहा तो भारतासाठी किती सामने खेळला
- बीसीसीआयने मोहम्मद शमीच्या दुखापतीवर लंडनमधील उपचारानंतर दिली मोठी अपडेट, आयपीएलसह या स्पर्धेला मुकणार