महिला प्रीमियर लीग 2024 मध्ये आज गतविजेता मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात लढत झाली. या लढतीत यूपी वॉरियर्सने गतविजेत्यांना पराभवाची धुळ चारली. यूपीने मुंबई इंडियन्सचे 162 धावांचे आव्हान 17 षटकात 3 बॅटर्सच्या मोबदल्यात पार केले. यूपी कडून किरण नवगिरेने 31 चेंडूत 57 धावा चोपल्या. याचबरोबर ग्रेस हॅरिसने 17 चेंडूत नाबाद 38 धावा ठोकत यूपीचा विजय साकार केला आहे. यावेळी सामन्यादरम्यान एक व्यक्ती कडेकोट सुरक्षा व्यवस्थेला चकमा देत थेट मैदानात घुसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
तर हा संपूर्ण प्रकार मुंबई इंडियन्सच्या इनिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये घडला आहे. यावेळी ॲलिसा हिलीने त्या व्यक्तिला पकडून रोखण्याचा प्रयत्न केला होता. पण यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या व्यक्तिला पकडून मैदानाबाहेर काढले आहे. तसेच या व्यक्तीच्या हातात आरसीबीची जर्सी पहायला मिळाली होती.
याबरोबरच या सामन्यात किरण नवगिरेचे झंझावाती अर्धशतक आणि कर्णधार ॲलिसा हिलीसोबत पहिल्या विकेटसाठी केलेली तिची मोठी भागीदारी यांच्या जोरावर यूपी वॉरियर्सने महिला प्रीमियर लीगच्या (WPL) चालू हंगामात गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव करून आपले खाते उघडले आहे. तसेच पहिले दोन सामने जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला हेली मॅथ्यूजच्या अर्धशतकानंतरही प्रथम फलंदाजी करताना 6 विकेटच्या मोबदल्यात 161 धावाच करता आल्या होत्या. त्यानंतर यूपी वॉरियर्सने 16.3 षटकात तीन गडी गमावत 163 धावा करत विजय मिळवला आहे. तर वॉरियर्स संघाचा पहिल्या पहिल्या दोन सामन्यात पराभव झाला होता.
Alyssa Healy tackling the pitch invader tonight at the Chinnaswamy Stadium. pic.twitter.com/0Mg6yWWX9E
— MrSmooth (@MrSmooth180) February 28, 2024
दरम्यान, हेली मॅथ्यूजने त्याने 47 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 55 धावा केल्या होत्या. तसेच प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघ 6 विकेट्सवर 161 धावाच करू शकला होता. यामध्ये यास्तिका भाटिया (22 चेंडूत 26 धावा) सोबत पहिल्या विकेटसाठी 50 धावांची आणि नॅट स्कायव्हर ब्रंट (14 चेंडूत 19 धावा) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली होती. याशिवाय अमेलिया केरने 16 चेंडूत 23 धावा, पूजा वस्त्राकरने 12 चेंडूत 18 धावा आणि इसी वांगने 6 चेंडूत नाबाद 15 धावांचे योगदान दिले होते.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs ENG : पाचव्या कसोटी सामन्यात देवदत्त पडिक्कल करणार पदार्पण, अन् रजत पाटीदार…
- बीसीसीआयने अखेर ईशान किशन-श्रेयस अय्यरची जिरवली मस्ती, अखेर ज्याची शक्यता होती तेच झालं