वुमन्स प्रीमियर लीगचे वेळापत्रक समोर आले असून 23 फेब्रुवारील गतविजेता मुंबई इंडियन्स आणि उपविजेता दिल्ली कॅपिटल्स संघ आमनेसामने येणार आहे. या सामन्यापासून सामन्याला सुरुवात होणार आहे.मुळे गेल्या वर्षी अंतिम फेरीतील पराभवाचा वचपा दिल्ली कॅपिटल्स काढणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत आहेत.
याबरोबरच, पहिल्या हंगामामध्ये अंतिम फेरीचा सामना अतितटीचा झाला होता. तर दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीने 20 षटकात 9 गडी गमवून 131 धावा केल्या आणि विजयासाठी 132 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबई इंडियन्सने हे आव्हान 3 गडी गमवून 19.3 षटकात पूर्ण केलं होते.
या स्पर्धेच्या पहिल्या सत्रात मुंबई इंडियन्सने आठपैकी सहा सामने जिंकले होते. तर चांगल्या नेट रन रेटमुळे दिल्ली कॅपिटल्स पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर राहिली होता. तसेच आगामी हंगामातील पहिला सामना या महिन्यात शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे.
तसेच गेल्या मोसमात विजय मिळवल्यानंतर, मुंबई इंडियन्सने WPL 2024 लिलावापूर्वी 13 खेळाडूंना कायम ठेवताना हीदर ग्रॅहम, धारा गुजर, सोनम यादव आणि नीलम बिश्त यांना सोडले आहे. तर त्याच वेळी, शबनीम इस्माईलला 1.20 कोटी रुपये खर्च करून संघात सामील करण्यात आले आहे. तसेच एस सजना, अमनदीप कौर, कीर्तन बालकृष्णन आणि फातिमा जाफर यांचाही WPL 2024 लिलावात संघात समावेश करण्यात आला आहे.
इतर कोणत्याही संघाच्या तुलनेत मुंबईकडे सर्वात शक्तिशाली अष्टपैलू खेळाडू आहेत. यामध्ये हेली मॅथ्यूज, नताली सीव्हर ब्रंट आणि अमेलिया केर हे संघातील सर्वोत्तम खेळाडू आहेत जे जलद धावा करण्यात आणि नियमित अंतराने विकेट घेण्यास सक्षम आहेत. गेल्या मोसमात नताली सीव्हर ब्रंटने ३३२ धावा आणि १० बळी घेत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तर, हिली मॅथ्यूज 215 धावा आणि 16 विकेट्स घेण्यात यशस्वी ठरली होती.
दरम्यान, मुंबई इंडियन्सने WPL 2024मध्ये चार अष्टपैलू खेळाडू आहेत ज्यांना ते प्लेइंग 11 चा भाग बनवू शकतात. मात्र, यामुळे त्यांच्या गोलंदाजीवर परिणाम होऊ शकतो. वास्तविक, नताली सीव्हर ब्रंट, मॅथ्यू आणि अमेलिया केर बाहेर बसल्याने संघासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापन शबनीम इस्माईलला संधी देऊ शकते. त्याच्या आगमनाने, गेल्या मोसमात संघासाठी 15 विकेट घेणाऱ्या इसाबेल वँगवरला बाहेर बसावे लागू शकते.
महत्वाच्या बातम्या –
IPL 2024 : संपूर्ण संघासमोर मागितली गंभीरने मॅक्युलमची माफी; माजी कर्णधाराने स्वता: केला गौप्यस्फोट…
जडेजाच्या वडिलांनी तोडले मुलाशी सर्व संबंध, घरातील वाद चव्हाट्यावर; पत्नी रिवाबा ठरली कारण