भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला नवीन वळण आले आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर नोकरीवर रुजू होणाऱ्या कुस्तीपटूंवर प्रश्नांचा भडीमार केला जात होता. मात्र, आता कुस्तीपटूंकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, ते आंदोलनासाठी नोकरी सोडण्यासाठी तयार आहेत. बजरंग पुनिया याने म्हटले आहे की, जर न्यायाच्या लढाईत नोकरी अडथळा ठरत असेल, तर तो नोकरी सोडण्यासाठी तयार आहे.
काय म्हणाला पुनिया?
बजरंग पुनिया (Bajrang Punia) याच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, त्याचे आंदोलन आधीसारखेच सुरू राहील. पुनियाने ट्वीट करत म्हटले की, “आमच्या पदकांना 15-15 रुपयांची म्हणणारे आता आमच्या नोकरीच्या मागे लागले आहेत. आमचे आयुष्य धोक्यात आहे, त्यापुढे नोकरी खूपच लहान गोष्ट आहे. जर नोकरी न्यायाच्या मार्गात अडथळा ठरताना दिसली, तर तिचा त्याग करण्यासाठी आम्ही 10 सेकंदाचाही वेळ लावणार नाहीत. नोकरीची भीती दाखवू नका.”
हमारे मेडलों को 15-15 रुपए के बताने वाले अब हमारी नौकरी के पीछे पड़ गये हैं.
हमारी ज़िंदगी दांव पर लगी हुई है, उसके आगे नौकरी तो बहुत छोटी चीज़ है.
अगर नौकरी इंसाफ़ के रास्ते में बाधा बनती दिखी तो उसको त्यागने में हम दस सेकेंड का वक्त भी नहीं लगाएँगे. नौकरी का डर मत दिखाइए.
— Bajrang Punia ???????? (@BajrangPunia) June 5, 2023
पुनियाने यापूर्वी आंदोलन संपल्याच्या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे. तो म्हणाला की, “आंदोलन मागे घेण्याच्या बातम्या अफवा आहेत. ही बातमी आम्हाला नुकसान पोहोचवण्यासाठी पसरवली जात आहे. आम्ही मागे हटलो नाहीयेत आणि आम्ही आंदोलन मागेही घेतले नाहीये. महिला खेळाडूंची एफआयआर मागे घेण्याची बातमीही खोटी आहे. न्याय मिळेपर्यंत लढाई सुरू राहील.”
आंदोलन वापस लेने की खबरें कोरी अफ़वाह हैं. ये खबरें हमें नुक़सान पहुँचाने के लिए फैलाई जा रही हैं.
हम न पीछे हटे हैं और न ही हमने आंदोलन वापस लिया है. महिला पहलवानों की एफ़आईआर उठाने की खबर भी झूठी है.
इंसाफ़ मिलने तक लड़ाई जारी रहेगी ???????? #WrestlerProtest pic.twitter.com/utShj583VZ
— Bajrang Punia ???????? (@BajrangPunia) June 5, 2023
विनेश आणि साक्षीनेही दिले प्रत्युत्तर
खरं तर, आंदोलन संपल्याच्या बातम्यांनी त्यावेळी वेग पकडला, तेव्हा अशी माहिती समोर आली की, कुस्तीपटूंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली आहे. यानंतर अशीही माहिती समोर आली की, सोमवारी (दि. 05 जून) आंदोलन करणारी कुस्तीपटू साक्षी मलिक (Sakshi Malik) तिच्या रेल्वेतील नोकरीवर परतली आहे.
साक्षीनेही ट्वीट करत स्पष्ट केले की, नोकरीवर रुजू होण्याचा अर्थ असा नाहीये की, त्यांनी आंदोलनापासून स्वत:ला वेगळे केले आहे. तसेच, विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिनेही सांगितले की, ती आंदोलनाचा भाग आहे आणि तिची लढाई न्याय मिळेपर्यंत सुरू राहील.
कुस्तीपटूंच्या या आंदोलनाला देशभरातील अनेक दिग्गज व्यक्तींकडून पाठिंबा मिळाला आहे. त्यात 1983च्या विश्वविजेत्या भारतीय संघातील खेळाडूंचाही समावेश आहे. (wrestler bajrang punia ready to leave government job for the justice in wrestlers protest)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! साक्षी मलिकची कुस्तीपटूंच्या आंदोलनातून माघार? ट्वीट करत स्पष्टच म्हणाली…
कुस्तीपटूंना विश्वविजेत्यांची साथ! 1983 वर्ल्डकप विजेत्या संघाने दिले खास निवेदन