यष्टीरक्षक हा सामान्यत: एकमेव क्रिकेटपटू असतो जो मैदानात समोरच्या संघाबरोबर व फलंदाजांबरोबर जास्त बोलत असतो. परंतु सर्वच यष्टीरक्षक असे नसतात असे वृध्दिमान साहाचे मत आहे, तो यष्टी मागे उभा असताना, एम. एस. धोनीप्रमाणेच शांत राहणे पसंत करतो.
“मी कधीही महेंद्रसिंग धोनीला स्लेज करताना पहिले नाही. परंतु फलंदाजांना विचलित करणाऱ्या गोष्टी तुम्ही करू शकता, जसे की ‘खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली असून तुला खेळता येत नाहीये’ असे काहीतरी बोलू शकता.” असे भारताचा यष्टीरक्षक साहा म्हणाला.
साहाने कोलंबोमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन अप्रतिम झेल घेतले होते. या अप्रतिम झेल बद्दल विचारले असता साहा म्हणाला, “मी बालपणापासून ते पाहून आणि शिकत आहे की चेंडू मैदानावर बाउंस झाला की यष्टिरक्षकाने उठायचे, परंतु या ट्रॅकवर अधिक बाउंस अधिक होता. त्यामुळे मी माझे तंत्र थोडे बदलले आणि चेंडू मैदानावर बाउंस झाल्यानंतर थोड्या वेळाने उठायचो आणि खूप फायदा झाला.” एम एस धोनीनंतर कसोटीत तितकाच प्रभावी यष्टीरक्षक कोण असेल असे अनेक जणांचे मत होते मात्र हळू हळू का होईना साहाच्या यष्टीरक्षणाचे कौतुक होत असल्यामुळे स्थिती उत्तम असल्याचे दिसून येत आहे.