मुंबई। टीम इंडियाचा यष्टीरक्षक गोलंदाज वृद्धिमान साहा ओळखला जातो, तो मैदानावरचा शांत वावर आणि शानदार शॉट्स खेळण्याच्या क्षमतेसाठी. सोबतच तो मैदानाबाहेरही खूपच चर्चेत असतो. शनिवारी (दि. ३० एप्रिल) खेळल्या गेलेल्या मॅचनंतर त्याने आपल्या संघाच्या विजयासाठी श्रेय एक सुरेख पोस्ट लिहिली.
जिंकण्याच्या भावनेला अद्भुत असे संबोधत तो म्हणाला की, खरे पाहता विजय त्यांना शोधत स्वत:च त्यांच्याजवळ येतो. भारतातल्या आजवरच्या सर्वात उत्कृष्ट यष्टीरक्षकांपैकी एक असलेल्या वृद्धिमानमध्ये नेहमीच धोनीची झलक दिसते. त्याने भारतीय संघात स्वत:चे एक स्वतंत्र स्थान बनवले आहे. अनेक दुखापतींचा यशस्वी सामना करत वृद्धिमान इथवर आला आहे. सगळे अडथळे पार करत आता तो त्याची आयपीएलची टीम गुजरात टायटन्ससाठी मोलाची कामगिरी करतो आहे. यातूनच त्याची टीम पॉइंट टेबलवर नंबर वनला पोचली आहे.
गुजरातने केला बॅंगलोरचा पराभव
आयपीएल 2022 च्या 43व्या मॅचमध्ये गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरला सहा विकेट्सने पराभूत केले. बॅंगलोरचा कर्णधार फाफ डुप्लेसिस याने टॉस जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आधी फलंदाजी करत बॅंगलोरने 170 धावा केल्या. गुजरातने 19.3 षटकांमध्ये चार विकेट गमावत आपले लक्ष्य गाठले. राहुल तेवतिया आणि डेविड मिलरने पुन्हा एकदा गुजरातच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली. दोघांनीही 40 चेंडूंवर 79 धावांची नाबाद भागीदारी केली. तेवतिया 25 चेंडूंवर 43 धावा करत, तर मिलर 24 चेंडूंवर 39 धावा करून नाबाद राहिला.
यानंतर वृद्धिमान साहाने स्वदेशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कू ऍपवर लिहिले, “स्वत: विजयच आमची इतक्या वेळा गळाभेट घेतो! हे केवळ संघाच्या प्रयत्नानेच शक्य आहे.”
खेळाचे मैदान असो, की बाहेर कुठे, साहाच्या या यशस्वी संघर्षावर त्याचे चाहते फिदा आहेत. सोशल मीडियावर साहाचे समर्थक त्याच्या कौतुकाच्या पोस्ट करताना दिसत आहेत.
अनामिका नावाच्या यूजरने सोशल मीडिया ऍप ‘कू’वर लिहिले, “साहो रे साहा – यू आर लिव्हिंग बाय इट!”
सचिन राय नावाच्या यूजरने लिहिले की, “साहा, शमी आणि शुभमन – जेव्हा गुजरातमध्ये हे तीन एस आहेत, – यश निश्चित आहे. कारण यशाकडे हे सर्व S’s आहेत.”
आयुषी भारद्वाज नावाच्या एका यूजरने सोशल मीडिया ऍप ‘कू’वर वृद्धिमान साहासाठी लिहिले की, “तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केले, की एक बार फिर साबित कर दिया है “जेव्हा काळ कठीण येतो, तेव्हा काही लोक अजूनच ताकदवान बनून उभे ठाकतात.”
विवेक सिंग नावाच्या एका यूजरने सोशल मीडिया ऍप ‘कू’वर लिहिले, ‘साहाला, मारहाण केली गेली, धक्का दिला गेला आणि ब्लॅकमेल केले गेले… तरीही साहा केवळ खेळासाठी मनात प्रेम जपत उभा राहिला आणि त्याने आपल्या सगळ्या टीकाकारांना गप्प केले.”
साहाने आतापर्यंत खेळलेल्या ४ सामन्यांमध्ये ३३.२५च्या सरासरीने १३३ धावा चोपल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही ६८ आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लतितने रोखले राहुलचे तिसरे शतक; स्पायडरमॅन बनून यादवने घेतला शानदार झेल
४८वी कुमार-कुमारी राज्य कबड्डी अजिंक्यपद निवड चाचणी या दिवसापासून पुण्यात होणार







