---Advertisement---

WTC फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर विराटने सांगितले, ‘या’ गोष्टींकडे द्यावे लागेल टीम इंडियाला लक्ष

On: गुरूवार, जून 24, 2021 10:15 PM
Virat-Kohli
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे आयोजित जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात साउथॅम्पटन मैदानावर पार पडला. या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा आठ विकेटने पराभव करत न्‍यूझीलंड संघाने विजेतेपद जिंकले. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली खूप निराश दिसत होता.

विराट सामन्यानंतर म्हणाला की, उत्कृष्ट प्रदर्शन करण्यासाठी सारख्याच मानसिकता असणाऱ्या खेळाडूंना संघात स्थान देण्याची गरज आहे. विराटच्या मतानुसार, कसोटी क्रिकेटमध्ये सेटअप मर्यादीत षटकांच्या क्रिकेटप्रमाणे असायला पाहिजे, ज्यामध्ये असे अनेक खेळाडू असतील जे उच्च स्तरावर आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी तयार असतील.

यादरम्यान विराटने न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघामधील कोणताही खेळाडूचे नाव घेतले नाही, परंतु तो म्हणाला की, खेळाडूंनी धावा बनवण्यासाठी निश्चय दाखवला नाही. ज्यामुळे फलंदाजांवर अधिक दबाव पडला.

कसोटी क्रिकेटचा विशेषज्ञ म्हणुन ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा या सामन्यामध्ये संघर्ष करताना दिसून आला. तो पहिल्या डावात 54 चेंडू मध्ये 8 धावा तर दुसऱ्या डावात 80 चेंडू मध्ये 15 धावा करून बाद झाला.

सामन्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना विराटने सांगितले की, ‘आम्ही संघाला मजबूत बनवण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याचे मूल्यांकन करू आणि चर्चा चालूच ठेवणार आहोत. ज्यामध्ये संघाचे नुकसान आहे, अशा पद्धतीला आम्ही कधीच वापर करणार नाही.’

विराट पुढे म्हणाला की, ‘आम्ही आणखी एक-दोन वर्ष वाट पाहू शकत नाही आणि पुढील योजनांसाठी संघाला तयारी करावी लागेल. जर तुम्ही आमचा एकदिवसीय आणि टी20 चा संघ बघाल तर तुम्हाला दिसेल की, संघात खोली आहे. हा सखोलपणा कसोटी क्रिकेटमध्ये पाहिजे.’

कर्णधार विराट म्हणाला की, आम्हाला पुनर्मूल्यांकन आणि पुनर्योजना कराव्या लागतील आणि हे देखील समजून घ्यावे लागेल की संघांमध्ये कोणत्या गोष्टी आहेत आणि धाडसी कसे बनता येईल. उत्कृष्ट कामगिरीसाठी आम्हाला संघांमध्ये सारखी मानसिकता असणाऱ्या खेळाडूंची गरज आहे.’

अंतिम सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावांमध्ये 217 आणि दुसऱ्या डावांमध्ये 170 धावा केल्या होत्या. विराट पुढे म्हणाला की, आम्हाला धावा बनवण्याच्या पद्धती समजण्यासाठी निश्चितच चांगल्या योजनांवर काम करायची गरज आहे. आम्हाला खेळा सोबतच संघामध्ये ताळमेळ ठेवण्याची गरज आहे. मला नाही वाटत की यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येईल.

भारताला आता इंग्लंडविरुद्ध ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

पत्नीच्या संगतीत राहून युझवेंद्र चहलही बनलाय ‘डान्समास्टर’, बॉलिवूडच्या गाण्यांवर झक्कास नाचलाय

ओह.. समथिंग समथिंग! ‘ते’ ट्वीट करताना पानेसरने अनुष्काला केले टॅग, नेटकऱ्यांकडून झाला ट्रोल

‘पाच मिलियन लोकसंख्येच्या देशाने, १.४ बिलीयनच्या देशाला धूळ चारली,’ वॉनचा भारताला टोमणा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---