---Advertisement---

WTC Final, भारत वि. न्यूझीलंड: पहिल्या दिवशी पाऊस बनला खलनायक, ‘या’ नियमांनुसार होणार पुढील खेळ

---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील बहुप्रतिक्षित जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना द रोज बाउल स्टेडियम, साउथम्पटन येथे खेळवला जाणार आहे. हा सामना काल (१८ जून) सुरू होणे अपेक्षित होते. परंतु सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाची फलंदाजी पाहायला मिळाल्याने अखेर पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला.

अशात आज रोजी (१९ जून) स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३) खेळास सुरुवात होणार असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. याबरोबरच आता या ऐतिहासिक सामन्याला काही नियमही लागू होतील.

काल साउथम्पटनमध्ये दिवसभर पावसाची रिमझिम चालू होती. तत्पुर्वी रात्रीही मुसळधार पाऊस पडला होता. त्यामुळे सुरुवातीला कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवसाचे पहिले सत्र रद्द करण्यात आले असल्याचे सांगितले गेले. बीसीसीआयने सोशल मीडियाद्वारे यासंदर्भात माहिती दिली होती. त्यानंतर पुढे लंच ब्रेकनंतर खेळाला सुरुवात होईल अशी अपेक्षा होती. परंतु मैदानावर साचलेले पाणी आणि पुन्हा पडू लागलेल्या पावसांच्या सरी, यामुळे नाइलाजास्तव पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला.

यानंतर आता पहिल्या दिवसाची भरपाई आयसीसीच्या पुर्वनियोजित राखीव दिवसाद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना आता १९ जून ते २३ जून या कालावधीत होण्याची शक्यता आहे.

याबरोबरच उर्वरित दिवस षटकांची संख्या वाढवली जाणार असून तब्बल ९८ षटकांचा खेळ होणार आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी जवळपास अर्धा तास जास्त सामना खेळवला जाण्याचा प्रयत्न केला जाईल. दरम्यान लंच आणि टी ब्रेकचा अवधीही १५ मिनिटांनी कमी करण्यात आला आहे. याखेरीजही षटके उरल्यास ती राखीव दिवशी पूर्ण केली जातील.

महत्त्वाच्या बातम्या-

WTC Final: भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार बदल?, गावसकरांनी दिले ‘हे’ कारण

‘ये थी तेरी प्लॅनिंग?’ WTC फायनलचा पहिला दिवस पावसामुळे रद्द झाल्याने भन्नाट मिम्स व्हायरल

विराटसह इंग्लंडमध्ये असलेल्या अनुष्काची परिस्थिती ‘कभी खुशी, तर कभी गम’, पोस्ट शेअर करत म्हणते…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---