---Advertisement---

WTC FINAL : ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 270 धावांवर जाहीर, भारताला कसोटी जिंकण्यासाठी 444 धावांचे आव्हान

On: शनिवार, जून 10, 2023 6:57 PM
Team India
---Advertisement---

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजयासाठी भारताला 444 धावांचे लक्ष्य मिळाले. ऑस्ट्रेलियन संघाने आपला दुसरा डावत शनिवारी (10 जून) 8 बाद 270 धावांवर घोषित केला. कर्णधार पॅट कमिन्स याने विकेट गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने हा निर्णय घेतला. दुसरे सत्र संपण्याआधी ऑस्ट्रेलियन संघाने खेळपट्टी सोडण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावात यष्टीरक्षक फलंदाज ऍलेक्स कॅरी एकमेव होता, ज्याने ऑस्ट्रेलियासाठी अर्धशतक केले. 

पहिल्या डाव संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ 296 धावांच्या आघाडीवर होता. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 270 धावा केल्या आणि संघ एकूण 443 धावांची आघाडी घेऊ शकला. नाणेफेक गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. पहिल्या डाता ऑस्ट्रेलियने 469, तर भारताने 296 धावा केल्या होत्या. शुक्रवारी (9 जून) भारतीय संघ सर्वबाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा फलंदाजीसाठी आली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 4 बाद 124 धावा केल्या होत्या.

शनिवारी मार्नस लाबुशेन आणि कॅमरून ग्रीन यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली. देघेही अनुक्रमे 41* आणि 7* धावांसह खेळपट्टीवर कायम होते. पुढे ग्रीनने 25, तर लाबुशेनने 41 धावांवर विकेट गमावल्या. पहिल्या डावात महत्वपूर्ण योगदान दिलेले ट्रेविस हेड आणि स्टीव स्मिथ दुसऱ्या डावात मात्र मोठी खेळी करू शकले नाहीत. यावेली या दोघांनी अनुक्रमे 18 आणि 34 धावांवर विकेट गमावली. ऍकेक्स कॅरी () ऑस्ट्रेलियासाठी या डावात सर्वाधिक 66* धावा करू शकला.

गोलंदाजांच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर रविंद्र जडेजा () याने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराजला एक विकेट मिळाली.(WTC FINAL : Australia’s second innings declared at 270 runs, India challenged for 444 runs to win the Test)

बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –

‘मी असं कधीच पाहिलं नाही…’, रहाणेच्या बॅटिंग Technique बद्दल एबी डिविलियर्सची मोठी प्रतिक्रिया
भारतीय संघ किती धावसंख्या चेस करू शकतो? अजिंक्य रहाणेच्या उत्तरात पाहायला मिळाला आत्मविश्वास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---