ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (AUSvSA) यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला गेला. मेलबर्नमध्ये झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या चौथ्या दिवशी (29 डिसेंबर)एक डाव आणि 182 धावांची मोठा विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारताच्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सलग दुसऱ्यांदा खेळण्याचे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे.
ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यानंतर आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची गुणतालिका समोर आली असून ऑस्ट्रेलियाने 78.57 टक्केवारीसह पहिले स्थान कायम राखले आहे. तर भारत 58.93 टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका तीनवरून चौथ्या क्रमांकावर गेला आहे. त्यांची टक्केवारी 50 आहे. श्रीलंकेची 53.33 अशी टक्केवारी असल्याने ते तिसऱ्या स्थानावर आहेत.
या स्पर्धेत श्रीलंकेचे दोन सामने खेळायचे बाकी असून भारताचे 4 सामने बाकी आहेत. यामुळे भारताच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा बळकट झाल्या आहेत. श्रीलंका मार्चमध्ये न्यूझीलंडमध्ये न्यूझीलंड विरुद्ध तर भारत फेब्रुवारी-मार्चमध्ये घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 सामने खेळणार आहे. भारताचे सामने घरच्या मैदानावर असल्याने आणि या स्पर्धेची गुणतालिका पाहिली तर अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात होण्याची दाट शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा सामना जिंकत तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याचा हा निर्णय योग्य ठरला, कारण ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पाहुण्या संघाला 189 धावसंख्येवरच रोखले. त्याबदल्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 575 धावांचा डोंगर उभारला. यामध्ये डेविड वॉर्नर (David Warner) याने 200, ऍलेक्स कॅरी याने 111 आणि स्टीव्ह स्मिथ याने 85 धावा केल्या होत्या.
Another statement made by Australia in the #WTC23 race 💪
They travel to Sydney with an unassailable 2-0 series lead over South Africa.
Watch the rest of the #AUSvSA series LIVE on https://t.co/CPDKNxpgZ3 (in select regions) 📺
Scorecard 📝 https://t.co/FKgWE9ksfC pic.twitter.com/ejVw9wxN9F
— ICC (@ICC) December 29, 2022
दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 204 धावसंख्येवरच संपुष्टात आला. त्यामध्ये टेम्बा बावुमा याने सर्वाधिक अशा 65 धावा केल्या. यामध्ये ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लिऑन याने 3 आणि स्कॉट बोलंड याने 2 विकेट्स घेतल्या.
या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने जिंकला होता, तर शेवटचा आणि तिसरा सामना सिडनीमध्ये 4 ते 8 जानेवारी, 2023 दरम्यान खेळला जाणार आहे.
आयसीसी कसोटी अजिंक्यपद 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना जूनमध्ये इंग्लंडच्या ओव्हलवर होणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या वनडे संघातून बाहेर झाल्याने निराश ‘गब्बर’! इमोशनल पोस्ट व्हायरल
VIDEO: अरे, क्रीझवर राहा की! मिशेल स्टार्कची दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला वॉर्निंग