---Advertisement---

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या तिकिटाची किंमत गगनाला भिडली, मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

On: गुरूवार, मे 27, 2021 5:13 PM
---Advertisement---

आगामी 18 ते 22 जून दरम्यान इंग्लंड येथील साउथहँप्टन मध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. भारत व न्यूझीलंड सारख्या जागतिक क्रिकेटमधील दोन तुल्यबळ संघांमध्ये हा सामना होणार असल्यामुळे क्रिकेट विश्वात सध्या चर्चेला सुरुवात झाली आहे. या क्रिकेट स्पर्धेचा उत्साह यावरूनच मांडला जावू शकतो की सध्या सामन्याच्या तिकिटांसाठी मोठ्या प्रमाणात कसरत सुरू आहे. व विशेष बाब म्हणजे नुकत्याच एका सुप्रसिद्ध क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार सामन्याच्या सर्वात महागड्या तिकिटाची किंमत जवळजवळ दोन लाख रुपये झाली आहे.

जगातील एका आघाडीच्या क्रिकेट संकेतस्थळानुसार भारत व न्यूझीलंड मधील अंतिम सामन्यासाठी संपूर्ण जगभरातील क्रिकेट रसिक तिकीट खरेदीसाठी प्रयत्नांची शर्थ करत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी या संपूर्ण सामन्यासाठी केवळ चार हजार प्रेक्षकांची कमाल मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे अर्थातच सामन्याचे तिकीट मिळवणे मोठे खडतर कार्य ठरत आहे. तिकिटांची ही कमतरता लक्षात घेऊनच काही तिकिटे तब्बल दोन लाख रुपयांपर्यंत विकली जात असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान भारत आणि न्यूझीलंड मधील सामन्याचा विचार केला असता, भारतीय संघ या महत्वाच्या सामन्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंडला रवाना होणार आहे.सध्या भारतीय संघ मुंबई येथील एका हॉटेल मध्ये क्वारंटान असून, क्वारंटान कालावधी संपल्यानंतर सर्व खेळाडू एकत्रच प्रवास करणार आहेत. तर न्यूझीलंड संघाचा विचार केला असता त्यांचे सर्व प्रमुख खेळाडू हे सध्या इंग्लंड मध्ये आहेत. विशेष म्हणजे न्यूझीलंड संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी इंग्लंड विरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका देखील खेळणार आहे.त्यामुळे निश्चितच अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंड संघ भारतापेक्षा उत्तम रित्या तयार असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

आता रणजी खेळाडू देखील होणार करारबद्ध? आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी माजी फलंदाजाचा सल्ला

विस्डेनने इंग्लंडविरुद्धच्या विश्व एकादशची केली घोषणा, भारतीय खेळाडूंचे संघात वर्चस्व

बांग्लादेशची गरुडभरारी! भारतासह दिग्गज संघांना पछाडत या क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---