---Advertisement---

माजी भारतीय निवडकर्ता म्हणतोय, ‘ही’ चूक सुधारा, मग कसोटी चॅम्पियनशीप आपलीच

On: गुरूवार, जून 10, 2021 5:44 PM
---Advertisement---

विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. या अंतिम सामन्याची जगभरातील क्रिकेटप्रेमी वाट पाहात आहेत. १८ जून ते २२ जून दरम्यान साउथम्पटन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड असा हा सामना रंगणार आहे. या सामन्यात सर्वात जास्त धावा कोण करणार? तसेच सर्वाधिक बळी कोण टिपणार? यासंदर्भात जगभरातले क्रिकेटपटू आणि क्रिकेट जाणकार वेगवेगळे तर्कवितर्क लावत आहेत. अशात भारतीय माजी यष्टीरक्षक किरण मोरेंनी भारतीय संघाची एक समस्या शोधून काढली आहे आणि ती म्हणजे ‘फलंदाजी’.

भारतीय संघाचे माजी मुख्य निवडकर्ता मोरे यांनी सांगितले की, भारतीय संघ जरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकला असला; तरीही फलंदाजीमध्ये अजून भारतीय संघाचा सफाईदारपण दिसून आला नाही.

किरण मोरे भारतीय संघाच्या फलंदाजीला घेऊन चिंतेत आहेत. किरण मोरेंचे म्हणणे आहे की, या ऐतिहासिक सामन्यात भारतीय संघाला सांभाळून फलंदाजी करावी लागणार आहे. एका मुलाखतीत मोरे म्हणाले की, “भारतीय संघाची एकमात्र समस्या आहे ती म्हणजे फलंदाजी. भारतीय संघ अजूनही फलंदाजीत सांघिक खेळ करत नाही आहे. जेव्हा आपण न्यूझीलंड संघाकडून हरलो तेव्हा त्याचे एकमेव कारण म्हणजे आपली फलंदाजीच होती. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सुद्धा भारतीय फलंदाजांनी सांघिक खेळ दाखवला नाही. प्रत्येक डावात एक-दोन फलंदाज चांगली खेळी करून बाद होत होते”.

किरण मोरेंचा भारतीय फलंदाजीबद्दल प्रश्न उपस्थित करणे योग्यच आहे. गेल्या काही सामन्यांचा आढावा घेतल्यास दिसून येईल कि, पहिले ३-४ फलंदाज चांगले खेळले तर खालच्या फळीतील फलंदाज खराब खेळत असे. तसेच वरच्या फळीतील फलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यास बाकीचे फलंदाज स्वस्तात बाद होत असे. त्यामुळे फलंदाजीवर लक्ष देणे करणे खूप गरजेचे आहे.

येत्या १८ जूनपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना रंगणार आहे. या ऐतिहासिक सामन्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे (आईसीसी) ने प्रत्येक दिवशी ४००० प्रेक्षक स्टेडीयममध्ये उपस्थित असतील असे आयोजन केले आहे. आईसीसीचे म्हणणे आहे कि,  “क्रिकेट विश्वात पहिल्यांदाच कसोटी चॅम्पियनशीपचा असा सामना होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकवर्ग या सुंदर सामन्यापासून वंचित राहता कामा नये”

महत्त्वाच्या बातम्या-

श्रीलंका दौऱ्यावर ‘द वॉल’च्या पलटणची भरमार, फलंदाजी ते क्षेत्ररक्षण प्रशिक्षक सर्व द्रविडच्या पसंतीचे

‘रिषभ पंत खूप जास्तच आत्मविश्वासी आहे,’ पाहा असे का म्हणाले न्यूझीलंडचे प्रशिक्षक

दुसऱ्या कसोटीतून ऐनवेळी न्यूझीलंडच्या ‘या’ अनुभवी खेळाडूची माघार, पाठीच्या दुखण्याने खाल्ली उचल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---