---Advertisement---

चुकीला माफी नाही!! कर्णधार कमिन्सच्या ‘त्या’ दोन चुका भारताच्या पथ्यावर, कांगारुंच्या धावांचा डोंगर पोखरला

On: शुक्रवार, जून 9, 2023 9:12 PM
Pat-Cummins
---Advertisement---

भारतीय संघाचे धुरंधर अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांनी डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवशी संघाचा किल्ला लढवला. त्यांनी लंच ब्रेकपर्यंत 109 धावांची भागीदारी रचत भारताची धावसंख्या 60 षटकात 6 विकेट्सच्या मोबदल्यात 261पर्यंत पोहोचवली. यावेळी त्यांनी फॉलोऑनही टाळला. रहाणे आणि केएस भरत यांनी तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारताच्या 5 बाद 151 धावसंख्येवर केली. दिवसाच्या दुसऱ्या चेंडूवरच भरतला स्कॉट बोलँड याने क्लीन बोल्ड करत तंबूत धाडले. मात्र, कर्णधार पॅट कमिन्स याने दोन मोठ्या चुका केल्या.

भारतीय संघाने पहिल्या सत्रात वेगवान फटकेबाजी केली. याच जोरावर संघाची धावसंख्या 49व्या षटकाच्या समाप्तीसह 200च्या पार गेली. या सत्रात शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याला मोठे जीवनदान मिळाली, ज्याचे श्रेय ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्या नो-बॉलला गेले.

झालं असं की, 60व्या षटकात कमिन्सच्या चौथ्या चेंडूने शार्दुलच्या पॅडचा वेध घेतला. यावेळी त्यांनी जोराने अपील केली, ज्यावर पंचानीही बोट वर केले. यावेळी असे वाटले की, भारताला सातवा धक्का बसला आहे, पण शार्दुलने रिव्ह्यू घेण्यात क्षणभरही वेळ घालवला नाही. यानंतर तिसऱ्या पंचांनी रिप्लेमध्ये पाहिले आणि चेंडू नो-बॉल (No-Ball) घोषित केला. अशाप्रकारे शार्दुलला मोठे जीवनदान मिळाले. ही या सामन्यातील दुसरी वेळ आहे, जेव्हा पॅट कमिन्स नो- बॉल (Pat Cummins No- Ball) टाकून विकेट गमावून बसला.

यापूर्वी अजिंक्य रहाणे याला दुसऱ्या दिवशी कमिन्सच्या चेंडूवर पायचीत बाद झाला होता, पण नो-बॉलमुळे त्याला जीवनदान मिळाले. त्यानंतर रहाणेने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सांभाळून सामना केला. या सामन्यात रहाणे शतक ठोकण्यास चुकला. त्याने 129 चेंडूंचा सामना करताना 89 धावा केल्या. यामध्ये 1 षटकार आणि 11 चौकारांचा समावेश होता. या अर्धशतकामुळे रहाणे डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात अर्धशतक करणारा पहिला भारतीय ठरला. तसेच, शार्दुलनेही (51) अर्धशतक झळकावले.

पॅट कमिन्सचे नो-बॉल
डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात कमिन्सने 16 षटके गोलंदाजी करताना 6 नो-बॉल टाकले आहेत. यामधील 2 नो-बॉलमुळे ऑस्ट्रेलिया संघाचे मोठे नुकसान झाले. खरं तर, मागील काही वर्षांमध्ये कमिन्सने न थकता नो-बॉल टाकले आहेत. 1 जानेवारी, 2022नंतर त्याने 22 नो-बॉल टाकले आहेत. यात कॅमरून ग्रीन पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 26 नो-बॉल टाकले आहेत. (wtc final skipper pat cummins with 2 wickets ruled out cause of no balls)

1 जानेवारी, 2022नंतर सर्वाधिक नो-बॉल टाकणारे ऑस्ट्रेलियन गोलंदाज
26- कॅमरून ग्रीन
22- पॅट कमिन्स
4- मिचेल स्टार्क
2- स्कॉट बोलँड
0- नेथन लायन

महत्वाच्या बातम्या-
उठ लाबूशेन जागा हो..! विकेट गेली वॉर्नरची पण झोप उडाली लाबूशेनची, मजेशीर व्हिडिओ तूफान व्हायरल
सिराजने रागाने स्मिथच्या दिशेने चेंडू फेकताच भडकले गावसकर अन् शास्त्री; म्हणाले, ‘हे काय सुरूये?’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---