जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2021-23चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणार आहे. बुधवारी (7 जून) सुरू होत असलेल्या या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर हा थरार पाहायला मिळणार आहे. पण हा सामना केव्हा आणि कसा पाहायला, याविषयी मनात शंका असणाऱ्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे. चला तर जाणून घेऊ डब्ल्यूटीसीच्या या अंतिम सामन्याविषयी महत्वाच्या गोष्टी.
जागतिक कसोटी अजिंक्यपदचा हा अंतिम सामना जिंकणे ऑस्ट्रेलियापेक्षा भारतीय संघासाठी महत्वाचे असणार आहे. कारण भारताने मागच्या 13 वर्षांमध्ये एकही आयसीसी ट्रॉफी जिंकली नाहीये. विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वात भारतीय संघाने पहिल्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र, यावेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारतीय संघ डब्ल्यूटीसीची गदा उंचावण्यासाठी पूर्ण ताकद लावेल.
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात भारतापुढे बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाचे आव्हान होते. या सामन्याआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ यावर्षी बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतही आमने सामने आले होते. भारतीय संघाने मायदेशातील ही मालिका 2-1 अशा अंतराने जिंकली होती.
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्याविषयी माहिती.
सामना – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, डब्ल्यूटीसी 2023चा अंतिम सामना
दिनांक आणि वेळ – 7 ते 11 जून, दुपारी 3 वाजता सुरुवात (भारतीय वेळेनुसार)
ठिकाण – द ओव्हल क्रिकेट स्टेडियम, लंडन
लाईव्ह स्ट्रीमिंग – स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिजनी प्लेस हॉटस्टार
दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ईशान किशन (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, उमेश यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलिया – उस्मान ख्वाजा, डेविड वॉर्नर, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, कॅमरून ग्रीन, एलेक्स केरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नाथन लियोन, स्कॉट बोलंड.
(WTC Final. When and where will see the thrill of India-Australia? Know everything in one click)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘कसं खेळावं हे त्याला सांगण्याची गरज नाही…’, WTC फायनलपूर्वी बोलला रोहित शर्माची
MPL 2023 लिलावात सर्वात महागडा ठरलेला नौशाद शेख आहे तरी कोण? 10 पट रक्कम घेत झाला कोल्हापूकर