जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा २३ जून रोजी समाप्त झाली. न्यूझीलंड संघाने भारताला नमवत या स्पर्धेचा पहिला विजेता बनला. एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानावर झालेल्या या सामन्यात अखेरच्या दिवशी अखेरच्या सत्रात न्यूझीलंडने ८ गडी राखून विजय मिळवला. या विजयानंतर न्यूझीलंडच्या संघाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तसेच न्यूझीलंड संघ या क्षणांचा आनंद लुटताना दिसतोय. त्यांनी, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा विजेता बनल्यानंतर मिळालेल्या गदेचे नामकरण केले आहे.
न्यूझीलंडच्या संघाने जिंकली जागतिक कसोटी चॅम्पियनशिप
दोन वर्षे चाललेल्या व क्रिकेटच्या १४४ वर्षांच्या इतिहासात प्रथमच आयोजित होत असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघावर वर्चस्व गाजवत विजेतेपद आपल्या नावे केले. कर्णधार केन विलियम्सनने दोन्ही डावात जबाबदारीने खेळ करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. वेगवान गोलंदाज कायले जेमिसनला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
न्यूझीलंड संघाने केले ट्रॉफीचे नामकरण
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकल्यानंतर न्यूझीलंड संघाला ट्रॉफी म्हणून एक खास गदा देण्यात आली. न्यूझीलंडच्या संघाने या गदेचे नामकरण केले आहे. त्यांनी या गदेला ‘मायकेल मेसन’ असे नाव दिले. योगायोगाने मायकल मेसन या नावाचा न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू देखील राहिला आहे. इंग्लंडमधून न्यूझीलंडला जाण्यापूर्वी त्यांनी हे नाव ठेवल्याचे जाहीर केले.
कोण होते मायकल मेसन
मायकल मेसन हे न्यूझीलंडचे माजी वेगवान गोलंदाज होते. त्यांनी आपल्या छोट्याशा कारकीर्दीत केवळ एक कसोटी सामना खेळला. मात्र, २००३ ते २०१० या काळात त्यांनी न्यूझीलंडसाठी २६ वनडे सामने खेळले. तसेच, ३ टी२० सामन्यात त्यांनी न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले आहे. सध्या ४६ वर्षाचे असलेले मेसन एका स्थानिक क्लबसाठी प्रशिक्षक म्हणून काम करतात.
महत्त्वाच्या बातम्या –
आपल्या देशाच्या चाहत्यांवर भडकला न्यूझीलंडचा ‘हा’ अष्टपैलू; म्हणाला, ‘त्यांच्या कृतीबद्दल माफ करा’
ये तो होना ही था! भारताचा पराभवानंतर मांजरेकरांनी जडेजावर साधला निशाणा, पाहा काय म्हणाले