वर्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेंटमधून (डब्ल्यूडब्ल्यूई) मोठी बातमी समोर येत आहे. दिग्गज ‘हॉल ऑफ फेमर’ स्कॉट हॉलचे मंगळवारी (१५ मार्च) वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून तो लाईफ सपोर्टवर होता. स्कॉटला हृदयविकाराचे झटके तीन आले होते. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या निधनामुळे डब्ल्यूडब्ल्यूईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनेक आजी-माजी दिग्गज स्कॉटच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. स्कॉट १९९०च्या दशकात ‘रेजर रेमन’ म्हणून ओळख मिळवली होती.
वर्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेंटने आपल्या अधिकृत वेबसाईटवरून लिहिले की, “डब्ल्यूडब्ल्यूई शोकसागरात आहे की, २ वेळचा डब्ल्यूडब्ल्यूई हॉल ऑफ फेमर स्कॉटचे निधन झाले आहे. डब्ल्यूडब्ल्यूईने स्कॉटचे परिवार, कुटुंब आणि चाहत्यांप्रती संवेदना व्यक्त केली आहे.
स्कॉटच्या निधनाे डब्ल्यूडब्ल्यूईच्या चाहत्यांना धक्का दिला आहे. त्यांनाही विश्वास बसत नाहीये की, हा सुपरस्टार या जगात राहिला नाही. २० ऑक्टोबर, १९५८ रोजी अमेरिकेत जन्मलेल्या स्कॉट हॉलने (Scott Hall) १९८४ मध्ये आपल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप रेसलिंग (WCW) कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर १९९१ मध्ये तो वर्ल्ड चॅम्पियनशिप रेसलिंगमध्ये सामील झाला. त्यानंतर त्याने यशाचं शिखर गाठलं. १९९२ मध्ये, स्कॉटला डब्ल्यूडब्ल्यूईने साईन केले, त्यानंतर तो रिंगमध्ये ‘रेझर रेमन’ म्हणून ओळखला जाऊ लागला. तो चार वेळा इंटरकॉन्टिनेंटल चॅम्पियन बनला. १९९६ मध्ये, स्कॉट पुन्हा डब्ल्यूसीडब्ल्यूमध्ये सामील झाला.
डब्ल्यूडब्ल्यूईने प्रो-रेसलिंग लिजेंडला ट्विटरवर श्रद्धांजली वाहिली. डब्ल्यूडब्ल्यूईने रेझर रॅमनच्या आवडत्या ओळींपैकी एक ओळ आठवत लिहिले की, “वाईट काळ टिकत नाही, पण वाईट लोक टिकतात.” ट्वीटमध्ये स्कॉट हॉलचा nWo टी-शर्ट घातलेला एक फोटोदेखील आहे.
"Bad times don’t last, but bad guys do." pic.twitter.com/Wvdh2wgCD2
— WWE (@WWE) March 15, 2022
आणखी एक डब्ल्यूडब्ल्यूई दिग्गज शॉन मायकलनेही (Shawn Michael) ट्विटरवर स्कॉटला श्रद्धांजली वाहिली. ट्रिपल एचने (Triple H) स्कॉटच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला. त्याने लिहिले की, “मी दुखावलो आहे…एक भाऊ गमावला आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो स्कॉट!! मी तुला भेटेन…#BuddySystem.”
I love you my friend!!
— Shawn Michaels (@ShawnMichaels) March 15, 2022
I’m gutted…Lost a brother
I love you Scott!!
I’ll see you down the road…#BuddySystem pic.twitter.com/Qx2he0TetS— Triple H (@TripleH) March 15, 2022
माध्यमांतील वृत्तानुसार, ६३ वर्षीय स्कॉटवर गेल्या आठवड्यात हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आली होती, परंतु त्यानंतर त्याला रक्ताच्या गुठळ्यांमुळे गंभीर समस्यांचा सामना करावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या-
बीएसएएमच्या अध्यक्षपदी राजन खिंवसरा यांची फेरनिवड
पीवायसी रिबाउंड रॅकेट लीग २०२२ स्पर्धेत तलवार्स व मस्किटर्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत