जगप्रसिद्ध डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार दलीप सिंह राणा उर्फ द ग्रेट खली (The Great Khali) हा राजकारणच्या रिंगणात उतरला आहे. खलीने गुरुवारी (१० फेब्रुवारी) दिल्ली येथे भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यालयात भाजपा सदस्यत्व स्वीकारले. (Khali Joins BJP)
काय म्हणाला खली
दिल्ली येथे भाजपाच्या मुख्यालयात त्याने पक्षात प्रवेश केला. यानंतर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला,
“भाजपामध्ये प्रवेश करून मी आनंदी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असलेल्या कामामूळे मी प्रभावित झालो. त्यांच्या नेतृत्वात देश पुढे चालला आहे. त्यामुळे, भाजपामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.”
विशेष म्हणजे खली याने काही दिवसांपूर्वी कृषी विधेयकांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे तो भाजपमध्ये प्रवेश करेल अशी शक्यता नव्हती. मात्र, पंजाब विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्याने केलेला हा पक्ष प्रवेश भाजपासाठी फायदेशीर ठरू शकतो असे म्हटले जात आहे.
शानदार राहिली कारकीर्द
पंजाब पोलीसमध्ये कार्यरत असलेल्या दलीप सिंह राणाने २००० मध्ये डब्ल्यूडब्ल्यूई या अमेरिकेतील खेळात प्रवेश केला होता. त्याने तिथे बराच नावलौकिक कमावला. तो अनेक वेळा या खेळाचा विजेता राहिला. २०२१ मध्ये त्याचा डब्ल्यूडब्ल्यूई हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. त्याने याव्यतिरिक्त काही हॉलीवूड व बॉलीवूड चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. प्रसिद्ध रियालिटी शो बिग बॉसचा तो उपविजेता देखील राहिला. सध्या तो युवा खेळाडूंसाठी रेसलिंग अकादमी चालवत आहे.
महत्वाच्या बातम्या-
किंग कोहलीचे ‘श्रीवल्ली सेलिब्रेशन’; व्हिडिओ होतोय व्हायरस
IPL Memories| जेव्हा युवराजसाठी विजय मल्ल्यांनी लिलावात घातला गोंधळ
टीम इंडियाचा वेस्ट इंडिजला अकरावा धोबीपछाड! तब्बल १६ वर्षांपासून भारत अजिंक्य