---Advertisement---

चक्क WWE सुपरस्टार ‘द रॉक’ पाहतोय भारत-पाक सामन्याची वाट! बघा काय म्हणतोय

On: मंगळवार, ऑक्टोबर 18, 2022 7:20 PM
---Advertisement---

टी20 विश्वचषकाचा (2022 T20 World Cup) नारळ ऑस्ट्रेलियात फुटला आहे. पहिल्या फेरीच्या पहिल्या तीन दिवसात अनेक अनपेक्षित निकाल लागले. असे असले तरी सर्व चाहत्यांना 23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान (INDvPAK) सामन्याची प्रतीक्षा आहे. क्रिकेटविश्वातील हे दोन्ही मातब्बर संघ ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठ्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंड अर्थात एमसीजी (MCG) आमने-सामने येथील. सर्वजण या सामन्याची प्रतीक्षा करत असताना सुप्रसिद्ध डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार द रॉक याचा देखील एक व्हिडिओ समोर आला आहे.

टी20 विश्वचषकाचे प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्सने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये रॉक पण भारत-पाकिस्तान सामन्यासाठी आतुर असल्याचे म्हणताना दिसतोय. तो म्हणाला,

 

‘जेव्हा कट्टर प्रतिस्पर्धी भिडतात तेव्हा जग थांबते. भारत पाकिस्तानचा सामना येतोय. हा फक्त एक सामना नाही. ही ग्रेटेस्ट रायवलरी आहे.’

या व्हिडिओच्या अखेरीस तो आपल्या चिरपरिचित अंदाजात भुवई उडवताना दिसतोय. द रॉक हा डब्ल्यूडब्ल्यूई इतिहासातील सर्वात प्रसिद्ध खेळाडू आहे. तसेच तो हॉलीवुड अभिनेता म्हणून देखील काम करतो.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मागील विश्वचषकात झालेल्या सामन्यात भारतीय संघाला लाजिरवाणा पराभव करावा लागला होता. मागील महिन्यात झालेल्या आशिया चषकातील महत्वाच्या सामन्यात भारतीय संघ पाकिस्तानकडून पराभूत झालेला. या दोन्ही पराभवांचा बदला घेण्याची संधी भारतीय संघाकडे असेल. भारत आणि पाकिस्तान प्रथमच ऑस्ट्रेलियात एकमेकाविरुद्ध टी20 सामना खेळणार आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या गटात दक्षिण आफ्रिका व बांगलादेश हे संघही आहेत. तसेच, पहिल्या फेरीतून झालेले दोन संघ देखील या गटात सामील होतील.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
फर्ग्युसन कॉलेज विजयेंद्र कुलकर्णी मेमोरियल टेनिस स्पर्धेत भक्ती ताजने, स्वानिका रॉय, श्रावणी देशमुख यांची आगेकूच
मुलाच्या सिलेक्शनची वेळ आली तेव्हा बीसीसीआयचे नवे अध्यक्ष मिटींगमधून गेले होते बाहेर

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---