माजी डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन आणि भारतीय दिग्गज दिलीप सिंग राणा उर्फ द ग्रेट खली यांच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी आहे. खली यांची ७९ वर्षांची आई तांडी देवी यांचे रविवारी (२० जून) निधन झाले आहे. त्या मागील काही काळापासून दीर्घ आजाराशी झुंज देत होत्या. त्यांच्यावर लुधियानाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर रविवारी रात्री त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यानंतर त्यांचे पार्थिव राहते गाव नैनीधर येथे आणले गेले असून तिथे सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या निधनानंतर सर्व क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, खलीची ७९ वर्षीय आई यांची तब्येत बऱ्याच दिवसांपासून खराब होती. त्यानंतर १४ जून रोजी त्यांना लुधियाना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा कोरोना अहवाल नेगेटिव्ह आला होता. प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचार सुरु असताना खलीही त्यांच्यासोबत रुग्णालयात होता.
खलीचा मोठा भाऊ मंगल राणा यांनी त्यांच्या आईच्या मृत्युची माहिती दिली आहे. याबरोबर त्यांनी सांगितले की, सोमवारी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
खली हा एक असा रेसलर आहे, ज्याने भारतातील रेसलिंग क्षेत्रामधील प्रतिभा पूर्ण जगाला दाखवून दिली आहे. त्याने ७ एप्रिल २००६ रोजी स्मॅकडाउनमझ्ये प्रवेश केला होता. त्यावेळी द अंडरटेकर आणि मार्क हेनरी यांची लढत चालू होती. यावेळी लढतीदरम्यान खलीची एंट्री झाल्याचे पाहून अंडरटेकरही दंग झाला होता. खलीने आपल्या मुव्हने अंरटेकरला रिंगमध्ये चित केले होते. डब्लूडब्लूई मध्ये दिग्गज रेसलरही खालीला घाबरत असे , या दिग्गज रेसलरने भारताचे अनेकदा डब्लूडब्लूईमध्ये नाव गाजवले आहे.
खलीने त्याच्या रेसलिंग कारकिर्दीत आतापर्यंत अनेक किर्तीमान आपल्या नावे केले आहेत. वयाच्या ४८ व्या वर्षी त्याची डब्ल्यूडब्ल्यू ऑफ हॉल ऑफ फेममध्ये निवड झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
‘इंग्लंडच्या खेळाडूंनी हात धुवून डिवचलं, पण मला फरक पडला नाही,’ भारताच्या अष्टपैलूची प्रतिक्रिया
चित्याहूनही जास्त चपळ! हवेत उडी मारत अगदी क्षणभरात कोहलीने पकडला एकहाती कॅच
अवघ्या २२ धावांवर अष्टपैलू अश्विन तंबूत, पत्नीने चकित होत दिली ‘अशी’ प्रतिक्रिया