नुकतेच ओमान क्रिकेट संघाने भारतातील मुंबई क्रिकेट संघाला ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी आमंत्रित केले होते. तेव्हा अनेक युवा खेळाडूंना या मालिकेत खेळण्याची संधी मिळाली होती. यातीलच एक राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल देखील या दौऱ्यात सामील होता. या मालिकांमध्ये जयस्वालने दमदार कामगिरी केली. याबद्दल त्याने भाष्य केले आहे.
जयस्वालने मालिकेच्या काही आठवड्यांपूर्वी भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर बरोबर झालेल्या एका सत्रामुळे त्याच्या खेळण्यात खूप सुधारणा झाल्याचे कबूल केले.
तसेच ओमान विरुद्धच्या मालिकेपूर्वी आपल्या आपला आदर्श असलेल्या सचिन तेंडुलकर सोबत एका चर्चासत्रात वेळ घालवायला मिळाल्याबाबत जयस्वालने स्वतःला भाग्यशाली असल्याचे सांगितले.
जयस्वालने यूएईमध्ये सुरू होणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी राजस्थान रॉयल्स संघात सामील झाल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. यानंतर बोलताना तो म्हणाला, “नेहमी पासूनच माझे आदर्श सचिन तेंडुलकर राहिले आहेत. मी खरंच खूप भाग्यशाली होतो, की ओमान दौऱ्यापूर्वी मला त्यांच्या सोबत चर्चा करण्याची संधी मिळाली.”
“मी खरंच आनंद झाला होता, जेव्हा मी पहिल्यांदा ऐकले की सचिन सर ओमान दौऱ्यापूर्वी एका सत्रासाठी उपस्थित राहणार आहेत. तेव्हा त्यांनी याबाबत मला खूप काही सांगितले, जिथे मी माझ्यात सुधार करू शकतो. तसेच मला या गोष्टीचा देखील खूप आनंद झाला की, त्यांच्यासारखा एक दिग्गज खेळाडू माझ्या खेळाबाबत देखील जाणून आहे. जे माझ्यासाठी खरंच खूप अद्भुत आहे,” असेही जयस्वाल म्हणाला.
तसेच त्याला क्रिकेट खेळण्यासाठी संधी मिळाल्यामुळे आपल्या प्रदर्शनाबाबत बोलताना जयस्वाल म्हणाला, “ओमान विरुद्ध खेळणे माझ्यासाठी आयपीएलच्या आगामी सामन्यांसाठी एका सराव सामन्यासारखे होते. खूप दिवसानंतर मी प्रतिस्पर्धी क्रिकेट खेळलो होतो. तेही ओमान सारख्या संघासोबत, जे की एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा संघ आहे. मी खूश आहे की या दरम्यान मी संघासाठी धावा करू शकलो.”
दरम्यान, यशस्वी जयस्वाल आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल संघाकडून खेळतो. आयपीएलचा दुसरा टप्पा यूएईमध्येच होणार आहे. त्यामुळे जयस्वाल ओमान दौरा संपवून सरळ यूएईमध्ये आपल्या संघात सामील झाला होता. भारतात झालेल्या आयपीएलमध्ये जयस्वालची समाधानकारक कामगिरी राहिली होती. मात्र दुसऱ्या टप्प्यात जयस्वालकडे चांगली कामगिरी करण्याची संधी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–टी२० विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघाबाबत कर्णधार बाबार आझमची नाराजी? पीसीबीने दिले उत्तर
–‘ज्यांना वर्षानुवर्षे हरवलं, त्यांच्यासमोर करावा लागतोय संघर्ष’, माजी इंग्लिश कर्णधाराचा घरचा आहेर
–“तर शार्दुल कपिल देव नंतर भारतीय संघात असलेली अष्टपैलू खेळाडूची समस्या सोडवू शकतो”