---Advertisement---

चेन्नईविरुद्ध जयस्वाल ‘यशस्वी’! इशान किशनला मागे टाकत ‘या’ विक्रमाच्या यादीत पटकावला अव्वल क्रमांक

On: रविवार, ऑक्टोबर 3, 2021 5:01 PM
---Advertisement---

शुक्रवारी (२ ऑक्टोबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ४८ वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ७ विकेट्सने विजय मिळवला. या विजयात १९ वर्षीय सलामीवीर यशस्वी जयस्वालने मोलाचा वाटा उचलला. त्याने १९ चेंडूत अर्धशतक झळकावत एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

या सामन्यात चेन्नईने राजस्थानला १९० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून यशस्वीने तुफानी फलंदाजी केली. त्याने १९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. हे अर्धशतक पूर्ण केले असताना त्याचे वय १९ वर्षे आणि २७९ दिवस होते.

त्यामुळे तो २० चेंडूंच्या आत आयपीएलमध्ये अर्धशतक करणारा यशस्वी सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम इशान किशनच्या नावावर आहे. त्याने ९ मे २०१८ रोजी कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध १७ चेंडूत अर्धशतक केले होते, तेव्हा त्याचे वय १९ वर्षे २९५ दिवस होते. या सामन्यात यशस्वीने २१ चेंडूत ५० धावा केल्या. या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकार मारले.

राजस्थानचा विजय
या सामन्यात ऋतुराजच्या शतकाच्या जोरावर चेन्नईने २० षटकात ४ बाद १८९ धावा केल्या आणि राजस्थानला १९० धावांचे आव्हान दिले. चेन्नईकडून ऋतुराज व्यतिरिक्त फाफ डू प्लेसिसने २५ धावांची खेळी केली. तर मोईन अलीने २१ धावा केल्या. तसेच अखेरच्या काही षटकात रविंद्र जडेजाने आक्रमक खेळी केली. त्याने १५ चेंडूत नाबाद ३२ धावा केल्या. राजस्थानकडून राहुल तेवतियाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर चेतन साकारियाने १ विकेट घेतली.

त्यानंतर १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांनी तुफानी फलंदाजी करत अर्धशतके झळकावली. त्यांना एविन लुईस (२७), संजू सॅमसन (२८) आणि ग्लेन फिलिप्सने (१४*) चांगली साथ दिली. जयस्वालने २१ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ५० धावा केल्या. तर, दुबे ४२ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ६४ धावांवर नाबाद राहिला.

त्यामुळे १७.३ षटकात राजस्थानने धावांचा पाठलाग पूर्ण केला. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या, तर केएल असिफने १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या – 

शास्त्री गुरुजींकडून धोनीच्या महानतेवर शिक्कामोर्तब; म्हणाले…

कोलकाता वि. हैदराबाद सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

पंजाब किंग्जची मालकीण प्रीतिसोबत दिसलेले ‘ते’ गोंडस बाळ नक्की कोणाचे? सर्वांनाच लागलीय हुरहुर

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---