---Advertisement---

यशस्वी जयस्वालचा खतरनाक झेल, फलंदाज-गोलंदाज कोणाचाच विश्वासच बसेना! VIDEO पाहाच

---Advertisement---

भारत आणि बांगलादेश यांच्यात सध्या कानपूरमध्ये कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

या सामन्यात बांगलादेशचा सलामी फलंदाज झाकीर हसन खातं न उघडता बाद झाला. त्यानं तब्बल 24 चेंडूंचा सामना केला, पण त्याला एकही धाव घेता आली नाही. वेगवान गोलंदाज आकाश दीपनं झाकीरला बाद केलं. यशस्वी जयस्वालनं स्लीपमध्ये त्याचा शानदार झेल घेतला. यशस्वीच्या या झेलचं आता सर्वत्र कौतुक होत आहे.

सामन्याच्या 9व्या षटकात आकाश दीप गोलंदाजीला आला होता. त्यानं चौथ्या स्टंपवर चेंडू टाकला, जो गुड लेंथवर होता. फलंदाज बचावासाठी गेला होता पण चेंडू बॅटच्या काठाला लागला आणि गल्लीच्या उजव्या बाजूला गेला. तेथे जयस्वाल स्लिपमध्ये उभा होता. त्यानं उजवीकडे डायव्ह मारत खूपच अप्रतिम झेल घेतला. मात्र, जयस्वालनं हा झेल योग्यरित्या घेतला की नाही, याबाबत संभ्रम होता. अशा स्थितीत मैदानावरील अंपायरनं तिसऱ्या अंपायरची मदत घेतली. तिसऱ्या अंपायरनं वारंवार टीव्ही रिप्ले पाहिल्यानंतर झेल वैध असल्याचा निर्णय घेतला.

जयस्वालनं जेव्हा कॅच घेतला, तेव्हा बॅट्समन झाकीरचा यावर विश्वासच बसत नव्हता. झेल झाल्यानंतरही तो पॅव्हेलियनच्या दिशेने गेला नाही. त्यानं तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली. थर्ड अंपायरनं जेव्हा आऊट असा निर्णय दिला, त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला. तुम्ही जयस्वालच्या कॅचचा व्हिडिओ येथे पाहू शकता.

 

भारताची प्लेइंग इलेव्हन – यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

बांगलादेशची प्लेइंग इलेव्हन – शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद

हेही वाचा – 

ग्राऊंड स्टाफही विराट कोहलीचे जबरे फॅन! मनाला स्पर्श करणारा व्हिडिओ व्हायरल
संघाचा मोठा निर्णय! ड्वेन ब्राव्हो घेणार गौतम गंभीरची जागा…
शिखर धवनची संथ फलंदाजी; संघाचा दारुण पराभव, माजी आरसीबी खेळाडूची शानदार खेळी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---