भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी पुणे येथे खेळला जात आहे. त्यामध्ये भारताचा युवा स्टार खेळाडू यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) एक रेकार्ड आपल्या नावावर केला आहे. जो आतापर्यंत दिग्गज सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांना देखील त्यांच्या कारकिर्दीत जमला नाही.
भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) सामन्याच्या पहिल्या डावात यशस्वी जयस्वालला (Yashasvi Jaiswal) मोठी खेळी खेळण्यात अपयश आले. त्याने 60 चेंडूंचा सामना करत मात्र 30 धावा केल्या आणि तो फिरकीपटू ग्लेन फिलिप्सचा (Glenn Phillips) बळी ठरला. त्याच्या खेळीत 4 चौकारांचाही समावेश होता. पण जरी जयस्वालने मोठी खेळी खेळली नाही, परंतु या धावांच्या जोरावर त्याने चालू कॅलेंडर वर्षात कसोटी फॉरमॅटमध्ये आपल्या 1,000 धावा पूर्ण केल्या.
जयस्वालने 1,000 धावा पूर्ण करून मोठा रेकाॅर्ड आपल्या नावावर केला. खरे तर, वयाच्या 23 वर्षापूर्वी एका कॅलेंडर वर्षात 1,000 किंवा त्याहून अधिक कसोटी धावा करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे महान सुनील गावसकर (Sunil Gavaskar) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) देखील हा रेकाॅर्ड करू शकले नाहीत. सध्याचे दिग्गज भारतीय रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनाही ही कामगिरी करता आली नाही.
वयाच्या 23व्या वर्षी एका कॅलेंडर वर्षात 1000+ कसोटी धावा-
1193 – गारफिल्ड सोबर्स (1958)
1198 – ग्रॅम स्मिथ (2003)
1008 – एबी डिव्हिलियर्स (2005)
1013 – ॲलिस्टर कुक (2006)
1007* – यशस्वी जयस्वाल (2024)
महत्त्वाच्या बातम्या-
“कारकिर्दीतील सर्वात खराब शॉट”, फुलटॉसवर बाद झालेल्या कोहलीचे भारतीय दिग्गजाने टोचले कान
IND vs NZ; केवळ एकाच धावेवर बाद कोहली! भारतात फिरकीपटूंविरूद्ध खूपच खराब रेकाॅर्ड
मोठी बातमी! क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हटवली वॉर्नरवरील आजीवन कर्णधारपदाची बंदी