पाकिस्तानचा फलंदाज अहमद शहजादनं भारताच्या पुढील कर्णधाराबाबत मोठं भाकीत केलं आहे. शहजादनं रोहित शर्मानंतर भारताचा कर्णधार कोण होऊ शकतो, त्या खेळाडूचं नाव सांगितलं. शहजादनं ज्या खेळाडूचं नाव घेतलं, ते ऐकून अनेक चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
पाकिस्तानचा ‘विराट कोहली’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अहमद शहजादनं युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालला भारताचा भावी कर्णधार म्हटलंय. शहजाद म्हणाला, “जयस्वालचा प्रवास अप्रतिम होता. मुंबईच्या रस्त्यांवरून आज तो ऑस्ट्रेलियात आपल्या फलंदाजीनं खळबळ माजवत आहे. जयस्वाल भविष्यात कर्णधार होऊ शकतो. मी त्याला एक असा खेळाडू म्हणून पाहतो, जो नक्कीच भारताचा कर्णधार बनण्यास पात्र आहे.”
शहजादनं असंही म्हटलं की, “यशस्वी जयस्वालनं ऑस्ट्रेलियात झळकावलेलं शतक अप्रतिम होतं. ऑस्ट्रेलियात जाऊन एवढ्या कमी कालावधीत शतक ठोकणं ही काही छोटी गोष्ट नाही. या खेळाडूचं भविष्य उज्ज्वल आहे. तो भारताचा पुढचा स्टार असेल. तो एक मोठा खेळाडू आहे.” असं असलं तरी, शहजादनं कबूल केलं आहे की, एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहितनंतर भारताचं कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे दिलं जाईल.
यावेळी अहमद शहजादनं भारतीय संघाचंही कौतुक केलं. ऑस्ट्रेलियात भारतीय संघानं कसा कमबॅक केला हे आश्चर्यकारक होतं, असं तो म्हणाला. न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मालिकेत भारताला 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवानंतर भारतीय संघाकडून फारसे वक्तव्य आले नाहीत. संघानं एक रणनीती बनवली आणि ती ऑस्ट्रेलियात राबवली. मी भारतीय संघाला सध्याच्या जागतिक क्रिकेटमधील सर्वात मजबूत संघ मानतो, असं शहबाज म्हणाला.
बॉर्डर-गावस्कर मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत असून मालिकेतील चौथा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाईल.
हेही वाचा –
“मी खूप निराश आहे, कारण….”; दोन ऑलिम्पिक पदके जिंकलेल्या मनू भाकरने व्यथा मांडली
6,6,6,6,6….सोलापूरच्या वाघिणीने हाणले सलग 5 षटकार! जबरदस्त व्हिडिओ एकदा पाहाच
U19 Women’s World Cup 2025: विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर, या खेळाडूकडे कर्णधाराची जबाबदारी