मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश यांच्यात बेंगलोरच्या मैदानावर रणजी ट्रॉफी २०२१-२२ चा दुसरा उपांत्य फेरी सामना सुरू आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी मुंबई संघाने सामन्यावर मजबूत पकड बनवली आहे. मुंबईचा संघ उत्तर प्रदेशपेक्षा ६३३ धावांनी आघाडीवर आहे. मुंबईला भक्कम स्थितीत आणण्यात यशस्वी जयस्वाल याचा मोठा हात आहे. त्याने या सामन्यातील दुसऱ्या डावातही शतकी खेळी केली आहे. यासह मुंबईच्या रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील खास यादीत जयस्वालचे नाव जोडले गेले आहे.
उत्तर प्रदेशविरुद्धच्या (Uttar Pradesh vs Mumbai) दुसऱ्या उपांत्य फेरी सामन्यातील दुसऱ्या डावात जयस्वालने (Yashasvi Jaiswal) सलामीला फलंदाजीला येत १८१ धावांची शानदार खेळी केली. ३७२ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि २३ चौकारांच्या मदतीने त्याने ही खेळी केली आहे. यापूर्वी पहिल्या डावातही त्याने खणखणीत शतक केले होते. २२७ चेंडू खेळताना १५ चौकारांच्या साहाय्याने त्याने १०० धावा फटकावल्या होत्या.
💯 in the first innings ✅
💯 in the second innings ✅Yashasvi Jaiswal took 54 balls to score his first run but has back-to-back centuries in the #RanjiTrophy semi-final 🤩#MCA #Mumbai #Cricket #Wankhede #BCCI #RanjiTrophy2022 https://t.co/ndGP3O8Glk
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) June 17, 2022
अशाप्रकारे एका रणजी ट्रॉफी सामन्यातील दोन्ही डावात शतक झळकावत (Two Centuries In Ranji Trophy Match) तो मुंबई संघाकडून रणजी ट्रॉफी सामन्यातील दोन्ही डावात शतक करणाऱ्या फलंदाजांच्या खास यादीत सहभागी झाला आहे. तब्बल १० वर्षांनंतर मुंबईकडून कोणी ही खास कामगिरी केली आहे. सचिन तेंडूलकर, रोहित शर्मापासून ते वसिम जाफर, अजिंक्य रहाणेपर्यंतचे फलंदाज या यादीत आहेत. तसेच एसएम कादरी, उदय मर्चंट, दत्तू फाडकर, विनोद कांबळी यांचेही यादीत नाव आहे.
रणजी ट्रॉफीत मुंबईकडून एका सामन्यातील दोन्हीही डावात शतक :
एमएस कादरी- १०५ आणि ११४ विरुद्ध वेस्टर्न इंडिया (१९३५-३६)
उदय मर्चंट- १४३ आणि १५६ विरुद्ध महाराष्ट्र (१९४८-४९)
दत्तू फाडकर- १३१ आणि १६० विरुद्ध महाराष्ट्र (१९४८-४९)
विनोद कांबळी- १२६ आणि १२७ विरुद्ध हैदराबाद (१९९०-९१)
सचिन तेंडूलकर- १४० आणि १३९ विरुद्ध पंजाब (१९९४-९५)
रोहित शर्मा- १४१ आणि १०८ विरुद्ध उत्तर प्रदेश (२००८-०९)
अजिंक्य रहाणे- १४३ आणि नाबाद १०१ विरुद्ध हरियाणा (२००९-१०)
वसिम जाफर- १३८ आणि नाबाद १०३ विरुद्ध सौराष्ट्र (२०१०-११)
यशस्वी जयस्वाल – १०० आणि १८१ विरुद्ध उत्तर प्रदेश (२०२१-२२)
103 (150)
100 (227)
131* (291)Our boy Yashasvi in the #RanjiTrophy knockout stages. 💗😍
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) June 17, 2022
यशस्वी जयस्वालचे रणजी ट्रॉफीत सलग तिसरे शतक
जयस्वाल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. उपांत्य फेरी सामन्यातील शतकी खेळींव्यतिरिक्त त्याने उत्तराखंडविरुद्धच्या सामन्यातही १०३ धावांची तुफानी खेळी केली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs SA | चौथ्या टी२० सामन्यात ‘या’ ६ खेळाडूंवर असेल विशेष जबाबदारी
कशी नशीबानं थट्टा आज मांडली! आयर्लंड दौऱ्यासाठी निवडकर्त्यांनी ‘या’ पाच खेळाडूंना केले दुर्लक्षित