शुक्रवारी (23 जून) वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी आणि वनडे संघांची घोषणा केली गेली. दोन्ही संघात अनेक युवा खेळाडूंना देखील संधी मिळालीये. कसोटी संघात मुंबईचा डावखुरा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याची निवड झाली. या दौऱ्यावर तो आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण देखील करू शकतो. असे असताना त्याने वेस्ट इंडीजला रवाना होण्यापूर्वी नुकतीच एक मुलाखत दिली. यामध्ये त्याने मागील वर्षी दुलीप ट्रॉफीमध्ये झालेल्या एका वादाविषयी खुलासा केला.
मागील वर्षे दुलीप ट्रॉफी अंतिम सामन्य दरम्यान झालेल्या एका वादाची चांगलीच चर्चा रंगली होती. पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करत असलेला यशस्वी विरोधी संघाच्या फलंदाजाला सातत्याने डिवचताना दिसलेला. त्यानंतर काही वेळा पंचांनी त्याला ताकीद दिलेली. मात्र, प्रकरण जास्त पुढे जाऊ नये यासाठी पश्चिम विभागाचे नेतृत्व करत असलेल्या अजिंक्य रहाणे याने यशस्वीला मैदानाबाहेर जाण्यास सांगितलेले. त्याच वादाविषयी आता स्वतः यशस्वीने खुलासा केला आहे. तो म्हणाला,
“खेळामध्ये आक्रमकता आवश्यक आहे. माझ्या स्वभावातही ही आक्रमकता दिसून येईल. मात्र, काही वेळा अशा गोष्टी घडून येतात ज्यामुळे आपण अधिक वाहवत जातो. त्या प्रसंगात मी तरीही काही सबुरीने घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ज्यावेळी तुमच्या आई बहिणीचा उद्धार होतो त्यावेळी राग येणे साहजिक आहे. ती गोष्ट मी ऐकून घेऊ शकत नाही.”
याच अंतिम सामन्यात द्विशतक झळकावल्यानंतर यशस्वी याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. देशांतर्गत क्रिकेट तसेच आयपीएलमध्ये धावांचा अक्षरशः रतीब घातल्यानंतर यशस्वी जयस्वाल याला भारतीय संघात संधी मिळाली आहे. मागील वर्षी देशांतर्गत हंगामात त्याने सर्वाधिक धावा बनवल्या होत्या. तसेच आयपीएलमध्ये तो उदयोन्मुख क्रिकेटपटू ठरलेला. हा सर्व विचार करत त्याला आता कसोटी संघात संधी मिळाली आहे. चेतेश्वर पुजाराच्या जागी तो तिसऱ्या स्थानी फलंदाजी करताना दिसू शकतो.
(Yashasvi Jaiswal Opens On Last Year’ Duleep Trophy Controversy)
महत्वाच्या बातम्या –
पीवायसी रिअल्टी सेव्हन चेस लीग स्पर्धेत तिसऱ्या फेरीअखेर मराठा वॉरियर्स आघाडीवर
वानखेडेवर रंगणार 2011 वर्ल्डकप फायनलचा रिमेक! असे आहे श्रीलंका संघाचे वेळापत्रक