भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मेलबर्न कसोटी अत्यंत रोमांचक स्थितीत पोहचली आहे. सामन्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही संघ विजयासाठी झगडत आहेत. दरम्यान, भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालच्या विकेटवरून गोंधळ झाला. यानंतर आता मोठा वाद होण्याची शक्यता आहे.
झालं असं की, सामन्याच्या पाचव्या दिवशी जयस्वालला कीपरच्या हाती झेलबाद आऊट देण्यात आलं. मात्र, जयस्वालच्या झेलवर स्नीको मीटरमध्ये कोणतीही हालचाल दिसून आली नाही. जयस्वालला आऊट केल्यावर स्टेडियममधून ‘चीटर-चीटर’ असे आवाज येत होते. याशिवाय या घटनेच्या वेळी कॉमेंट्री करत असलेले भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर हेही जयस्वालच्या विकेटवर संतापले होते.
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सनं जयस्वालला बाऊन्सर टाकला, ज्यावर त्यानं बॅट लेग साइडकडे स्विंग करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू त्याच्या बॅट आणि ग्लोव्हजजवळून जाऊन कीपरच्या हातात गेला. यावर ऑस्ट्रेलियाकडून अपील करण्यात आलं, परंतु मैदानावरील पंचांनी आऊट दिलं नाही. यानंतर ऑस्ट्रेलियाकडून रिव्ह्यू घेण्यात आला.
रिव्ह्यू घेतल्यानंतर थर्ड अंपायरनं तपासलं. स्क्रीनवर स्निकोमीटरही दाखवण्यात आला, ज्यामध्ये स्पष्टपणे दिसून आलं की चेंडू जयस्वालच्या बॅटला किंवा ग्लोजला लागला नाही. याशिवाय स्निकोमीटरमध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल झाली नाही. परंतु तरीही जयस्वाल याला बाद घोषित करण्यात आलं. अंपायरच्या या निर्णयावर यशस्वी नाराज दिसला. तो अंपायरशी काही बोलला देखील, पण शेवटी त्याला थर्ड अंपायरचा निर्णय मान्य करून पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं.
NO EDGE ON SNICKO, BUT YASHASVI JAISWAL IS OUT BECAUSE OF DEFLECTION. 🤯 pic.twitter.com/LoFjFCj25L
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 30, 2024
या घटनेवर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. या घटनेदरम्यान कॉमेंट्री करत असलेले ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज रिकी पॉन्टिंग यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. तुम्ही त्यांच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ येथे पाहू शकता.
🚨 BIG MOMENT ON THE GAME 🚨
– Ricky Ponting about the decision of Yashasvi Jaiswal. pic.twitter.com/69DOQlvGTR
— Johns. (@CricCrazyJohns) December 30, 2024
हेही वाचा –
भारत-ऑस्ट्रेलिया मेलबर्न कसोटीत घडला नवा इतिहास, 88 वर्ष जुना रेकॉर्ड उद्ध्वस्त!
मिचेल स्टार्कनं यशस्वी जयस्वालला पुन्हा छेडलं, युवा फलंदाजाचं सडेतोड उत्तर; पाहा व्हायरल VIDEO
विराट कोहलीच्या निवृत्तीची वेळ जवळ आलीय? पाहा आकडेवारी काय सांगते